dinvishesh

    १६ एप्रिल घटना

    जागतिक आवाज दिन

    १९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.
    १९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    १९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
    १९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) – सुरवात.
    १९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
    १८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

    १६ एप्रिल जन्म

    १९९१: आशिष खाचणे – चित्रपट आणि नाटक अभेनेते
    १९७८: लारा दत्ता – मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री
    १९७२: कोंचिता मार्टिनेझ – स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू
    १९६३: सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
    १९६१: जर्बोम गॅमलिन – अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४)
    १९४२: फ्रॅंक विल्यम्स – विल्यम्स एफ-१ रेसिंग टीमचे स्थापक
    १९३४: राम नाईक – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री
    १९२४: मदनजीत सिंग – भारतीय राजनयिक
    १८८९: चार्ली चॅपलिन – सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक – अकादमी पुरस्कार (निधन: २५ डिसेंबर १९७७)
    १८६७: विल्बर राइट – ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (निधन: ३० मे १९१२)

    १६ एप्रिल निधन

    २०००: अप्पासाहेब पवार – लेखक
    १९९५: रमेश टिळेकर – अभिनेते आणि वकील
    १९६६: नंदलाल बोस – भारतीय जगविख्यात चित्रकार – पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२)
    १८५०: मेरी तूसाँ – मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका (जन्म: १ डिसेंबर १७६१)