dinvishesh

    ६ मे घटना

    आंतरराष्ट्रीय नो डाएट डे

    २०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.
    २००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
    २००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
    १९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
    १९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
    १९८३: अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
    १९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
    १९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
    १८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उदघाटन झाले.
    १८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
    १८१८: राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
    १६३२: शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
    १५४२: सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा पोहोचला.

    ६ मे जन्म

    १९५५: ए. के. लोहितदास – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (निधन: २८ जून २००९)
    १९५३: टोनी ब्लेअर – ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष
    १९५१: लीला सॅमसन – भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका
    १९४३: वीणा चंद्रकांत गवाणकर – लेखिका
    १९४०: अबन मिस्त्री – प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ
    १९०४: ओरापिन चैयाकन – थायलंड देशाच्या संसदेवर निवडून आलेलय पहिल्या महिला (निधन: १ जानेवारी १९९६)
    १८६१: मोतीलाल गंगाधर नेहरु – भारतीय राजनीतीज्ञ (निधन: ६ फेब्रुवारी १९३१)
    १८५६: सिग्मंड फ्रॉईड – आधुनिक मानसशास्त्राचा जनक (निधन: २३ सप्टेंबर १९३९)

    ६ मे निधन

    २०२२: बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी – राजकारणी, आमदार (जन्म: १५ एप्रिल १९४९)
    २००१: मालतीबाई बेडेकरपुणे – विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका
    १९९९: कृष्णाजी शंकर हिंगवे – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य
    १९९५: आचार्य गोविंदराव गोसावी – प्रवचनकार आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक
    १९६६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सीनियर रँग्लर (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)
    १९५२: मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)
    १९४६: भुलाभाई देसाई – भारतीय राजनीतीज्ञ (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)
    १८७०: सर जेम्स यंग सिम्पसन – स्कॉटिश वैद्य, क्लोरोफॉर्मचे भूल देणारे गुणधर्माचे संशोधक (जन्म: ७ जून १८११)
    १८६२: हेन्री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (जन्म: १२ जुलै १८१७)
    १५८९: तानसेन – रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट