
ता. : 12 – 10 – 2023 गुरुवार
तिथी: त्रयोदशी
मिती: राष्ट्रीय मिति 20, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी 19:53
सूर्योदयकालीन नक्षत्र: पूर्वा फाल्गुनी 11:35, नंतर उत्तरा, योग- शुक्ल 9:28, नंतर ब्रह्मा, करण- गरज 6:47, नंतर वणिज 19:53, पश्चात विष्टि
सूर्योदय: 6:18, सूर्यास्त: 5:59
शुभ रंग: जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी
शुभ अंक: 3, 6, 9
शुभ रत्न: गुरुसाठी पुष्कराज
दिनविशेष 12 ऑक्टोबर – घटना
2019: एल्युड किपचोगे – हे व्हिएन्ना येथे 1:59:40 या वेळेसह दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारे पहिले व्यक्ती बनले.
2017: युनेस्को – अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
2012: युरोपियन युनियन – 2012चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकला.
2005: शेन्झोऊ 6 – दुसरे चिनी मानवी अंतराळ प्रक्षेपित झाले.
2002: बाली अतिरेकी बॉम्बहल्ला – इंडोनेशियातील बालीमधे झालेल्या बॉम्बस्फोटात 202 लोकांचे निधन तर 300 जखमी.
1998: पल्लवी शाह – यांनी चेस खेळातील इंटरनॅशनल वूमन मास्टर हा किताब मिळवला.
1994: मॅगेलन अंतराळयान – शुक्राच्या वातावरणात जळून खाक झाले.
1994: ड्रीमवर्क्स पिक्चर्स – सुरुवात.
1983: तनाका काकुऐ – लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.
1979: टायफून टिप – हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळ बनले.
1971: पर्शियन साम्राज्य – 2500 वर्षाचा उत्सव सुरू झाला.
1968: 19व्या ऑलिम्पिक स्पर्धा – मेक्सिको सिटी येथे 19व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
1968: इक्वेटोरियल गिनी – स्पेनपासून स्वतंत्र झाले.
दिनविशेष 12 ऑक्टोबर – जन्म
1946: अशोक मांकड – भारतीय क्रिकेटपटू
1935: शिवराज पाटील – भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे दहावे अध्यक्ष
1922: शांता शेळके – भारतीय कवयित्री आणि गीतलेखिका
1921: जयंतराव टिळक – भारतीय समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते
1918: एम. ए. चिदंबरम – भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक
1911: विजय मर्चंट – भारतीय क्रिकेटपटू, उद्योगपती व समाजसेवक
1868: ऑगस्ट हॉच – जर्मन उद्योजक, ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक
1864: कामिनी रॉय – भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला
1860: एल्मर ऍम्ब्रोस स्पीरी – अमेरिकन संशोधक, आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे जनक
दिनविशेष 12 ऑक्टोबर– निधन
2022: एन. कोवैथंगम – भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार
2020: कार्ल्टन चॅपमन – भारतीय फुटबॉल खेळाडू
2012: सुखदेव सिंग कांग – भारतीय न्यायाधीश व राजकारणी
2011: डेनिस रितची – अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते
1996: रेने लॅकॉस्ता – फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू, पोलो टी शर्टचे जनक
1967: राम मनोहर लोहिया – भारतीय समाजवादी नेते व लेखक
1965: पॉल हर्मन म्युलर – स्विस रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
1960: इनजिरो असानुमा – जपान सोशलिस्ट पार्टीचे पहिले सरचिटणीस