dinvishesh

    ता. : 15 – 10 – 2023, रविवार
    तिथी: प्रतिपदा
    मिती: राष्ट्रीय मिति 23, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा 24:32
    सूर्योदयकालीन नक्षत्र: चित्रा 18:11, योग – वैधृति 10:23, नंतर विष्कंभ, करण- किंस्तुघ्न 12:01, नंतर बव 24:32, पश्चात बालव
    सूर्योदय: 6:19, सूर्यास्त: 5:56
    शुभ रंग: सोनेरी आणि पिवळा
    शुभ अंक: 1, 2, 6
    शुभ रत्न: सूर्यासाठी माणिक

    दिनविशेष 15 ऑक्टोबर -घटना
    जागतिक विद्यार्थी दिन
    1997: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.
    1993: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.
    1984: आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
    1975: बांगलादेशातील रहिमा बानू ही 2 वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.
    1973: हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
    1932: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.
    1917: पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
    1888: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
    1878: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.

    दिनविशेष 15 ऑक्टोबर – जन्म
    1969: पं. संजीव अभ्यंकर – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
    1957: मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका
    1955: कुलबुर भौर – भारतीय फील्ड हॉकी खेळाडू
    1954: मिथिलेश चतुर्वेदी – भारतीय अभिनेते
    1949: प्रणोय रॉय – पत्रकार, एन. डी. टी. व्ही.चे संस्थापक
    1926: नारायण गंगाराम सुर्वे – कवी

    दिनविशेष 15 ऑक्टोबर – निधन
    2022: वैशाली टक्कर – भारतीय अभिनेत्री
    2022: जितेंद्र शास्त्री – भारतीय अभिनेते
    2022: के. मुरारी – भारतीय चित्रपट निर्माते
    2020: भानु अथैया – वेशभूषा डिझाईनर – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
    2012: नॉरदॉम सिहानोक – कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान
    2002: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार
    2002: ना. सं. इनामदार – प्रसिद्ध ऐतेहासिक कादंबरीकार