
ता. : 17 – 10 – 2023 मंगळवार
तिथी: तृतीया
मिती: राष्ट्रीय मिति 25, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन शुक्ल पक्ष तृतीया 25:26,
सूर्योदय कालीन नक्षत्र : विशाखा 20:30, योग- प्रीति 9:20, नंतर आयुष्मान, करण – तैतिल 13:23, नंतर गरज 25:26
सूर्योदय:6:20, सूर्यास्त: 5:55
शुभ रंग: गुलाबी, लाल
शुभ अंक: 9, 3, 6
शुभ रत्न: मंगळासाठी मुंगा किंवा प्रवाळ
दिनविशेष 17 ऑक्टोबर -घटना
आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
1998: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणाऱ्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.
1996: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
1994: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.
1979: मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.
1966: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
1956: पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरु झाले.
1943: बर्मा रेल्वे रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.
दिनविशेष 17 ऑक्टोबर – जन्म
1970: अनिल कुंबळे – भारतीय क्रिकेटपटू – पद्मश्री, अर्जुना पुरस्कार
1965: अरविंद डिसिल्व्हा – श्रीलंकेचे क्रिकेटपटू
1956: में कॅरोल जेमिसन – पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला अंतराळवीर
1955: स्मिता पाटील – भारतीय अभिनेत्री – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1947: सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका
1935: मायकेल इव्हिस – ग्लास्टनबरी फेस्टिव्हलचे निर्माते
1932: ललिता लाजमी – भारतीय चित्रकार
1930: रॉबर्ट अटकिन्स – अटकिन्स आहारचे निर्माते
1923: शिवानी – भारतीय लेखक
दिनविशेष 17 ऑक्टोबर -निधन
2008: रविन्द्र पिंगे – ललित लेखक
2008: बेन व्हिडर – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक
1993: विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
1981: कन्नादासन – भारतीय लेखक, कवी आणि गीतकार
1906: स्वामी रामतीर्थ – जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी
1887: गुस्ताव्ह किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
1882: दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक
1772: अहमदशाह दुर्रानी (दुराणी) – अफगणिस्तानचे राज्यकर्ता