dinvishesh

    ता. : 20 – 10 – 2023, शुक्रवार
    तिथी: षष्ठी
    मिती: राष्ट्रीय मिति 28, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन शुक्ल पक्ष षष्ठी
    सूर्योदयकालीन नक्षत्र : मूळ 8:30, योग – अतिगंदा, करण: कौवाला 11:59 नंतर,तैतिल
    सूर्योदय: 06:28 , सूर्यास्त: 5.42
    शुभ रंग: निळा,लाल, गुलाबी
    शुभ अंक: 6,3,9
    शुभ रत्न: शुक्र ग्रहासाठी स्फटिक आणि हिरा

    दिनविशेष 20 ऑक्टोबर – घटना
    जागतिक सांख्यिकी दिन

    जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
    2011: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्याच्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
    2001: रंगभूमीवर सुमारे 40 वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर.
    1995: ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
    1991: उत्तर काशी मध्ये 6.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन 1,00 पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
    1973: सिडनी ऑपेरा हाऊसचे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
    1971: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
    1970: हरित क्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
    1969: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
    1962: चीनने भारतावर आक्रमण केल्यामुळे चीन-भारत युद्धास सुरवात.

    दिनविशेष 20 ऑक्टोबर – जन्म
    1978: वीरेन्द्र सहवाग – भारतीय क्रिकेटपटू – पद्मश्री
    1963: नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
    1927: गुंटूर सेशंदर शर्मा – भारतीय कवी आणि समीक्षक
    1923: उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर – भारतीय ध्रुपद गायक – पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
    1920: सिद्धार्थ शंकर रे – पश्चिम बंगालचे सहावे मुख्यमंत्री
    1916: मेहबूबहुसेन पटेल – लोकशाहीर
    1916: शाहीर अमर शेख – लोकशाहीर
    1893: जोमोके न्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
    1891: सर जेम्स चॅडविक – ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक – नोबेल पुरस्कार
    1855: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक

    दिनविशेष 20 ऑक्टोबर –  निधन
    2015: सय्यद जहूर कासिम – भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ – पद्म भूषण, पद्मश्री
    2012: जॉन मॅककनेल – पृथ्वी दिनाची सुरवात करणारे
    2011: मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा
    2010: फारूख लेघारी – पाकिस्तानचे आठवे राष्ट्रपती
    2010: पार्थ सारथी शर्मा – भारतीय क्रिकेटपटू
    2009: बाबा कदम – गुप्तहेरकथालेखक
    1999: माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार
    1996: बंडोपंत गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक