dinvishesh

  आजचे पंचांग

  ता : 22 – 6 – 2023, गुरुवार
  तिथी : संवत्सर
  मिती 1, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी 17:27
  सूर्योदय : 5:44, सूर्यास्त : 7:03
  सूर्योदयकालीन नक्षत्र – आश्लेषा 28:17, योग – हर्षण 27:30 नंतर वज्र, करण- विष्टी 17:27, नंतर बव
  सण उत्सव : विनायक चतुर्थी
  सूर्य प्रवेश : आर्द्रा नक्षत्रात संध्या. 5:46 वाजता, वाहन मेंढा, नाडी-चंद्र चंद्र, स्त्री स्त्री, वर्षा योग- अत्यल्प
  मूळ : सकाळपासून दिवसभर व पहाटे 4:16 पर्यंत
  राहुकाळ : दुपारी 1:30 से 3:00
  शुभ अंक : 3,6,9
  शुभ रत्न : गुरू ग्रहासाठी पुखराज
  शुभ रंग : जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी

  दिनविशेष

  २२ जून घटना

  २००७: सुनिता विल्यम – या सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परतल्या.
  १९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण.
  १९९०: शीतयुद्ध – चेकपॉईंट चार्ली बर्लिनमध्ये उद्ध्वस्त केले गेले.
  १९८६: हॅंड ऑफ गॉड गोल – अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील १९८६ फिफा विश्वचषक सामन्याच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोनाने केलेला प्रसिद्ध हॅंड ऑफ गॉड गोल.
  १९८४: व्हर्जिन अटलांटिक एअरवेज – पहिले उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाले.
  १९७८: कॅरॉन, प्लूटोचा पहिला उपग्रह शोधण्यात आला.
  १९७६: कॅनडा – देशाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
  १९४८: युनायटेड किंगडममधील आधुनिक इमिग्रेशन – एचएमटी एम्पायर विंड्रश या जहाजाने ८०२ वेस्ट इंडियन स्थलांतरितांचा पहिला गट आणला.
  १९४८: ब्रिटनने भारतावरील राज्यकारभार सोडल्याच्या अर्ध्या वर्षानंतर राजा जॉर्ज (सहावा) यांनी औपचारिकपणे भारताचा सम्राट ही पदवी सोडली.
  १९४५: दुसरे महायुद्ध – ओकिनावाची लढाई: संपली.
  १९४४: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन बॅग्रेश: सुरवात.
  १९४२: अमेरिका – काँग्रेसने औपचारिकपणे निष्ठेची प्रतिज्ञा स्वीकारली.
  १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
  १९४१: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन बार्बरोसा: जर्मनीने सोव्हिएत युनियनवर आक्रमण केले.
  १९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  १९४०: दुसरे महायुद्ध – १९१८ मध्ये ज्या रेल्वेमार्गावर जर्मन लोकांनी युद्धविरामावर स्वाक्षरी केली त्याच रेल्वे कारमध्ये फ्रान्सला जर्मनीबरोबर दुसऱ्या कॉम्पिग्ने युद्धविरामावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले.
  १८९७: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.
  १७५७: प्लासीची लढाई – सुरू.
  १६३३: गॅलेलिओ गॅलिली – यांनी पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

  २२ जून जन्म

  १९७४: विजय – भारतीय अभिनेते
  १९५०: टॉम अल्टर – भारतीय अभिनेते – पद्मश्री (निधन: २९ सप्टेंबर २०१७)
  १९३२: अमरीश पुरी – ज्येष्ठ भारतीय अभिनेते (निधन: १२ जानेवारी २००५)
  १९०८: डॉ. विष्णू भिकाजी कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (निधन: ९ एप्रिल १९९८)
  १८९९: रिचर्ड गिर्ली ड्र्यू – मास्किंग टेपचे शोधक (निधन: १४ डिसेंबर १९८०)
  १८९६: बाबुराव पेंढारकर – नटश्रेष्ठ
  १८८७: ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (निधन: १४ फेब्रुवारी १९७५)
  १८०५: जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (निधन: १० मार्च १८७२)

  २२ जून निधन

  २०१४: रामा नारायणन – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: ३ एप्रिल १९४९)
  १९९४: एल. व्ही. प्रसाद – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १७ जानेवारी १९०८)
  १९९३: विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते
  १९५५: सदाशिव शिंदे – भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)