dinvishesh

  आजचे पंचांग

  ता : 23 – 6- 2023, शुक्रवार
  तिथी : संवत्सर
  मिती 2, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, आषाढ शुक्ल पक्ष पंचमी 19:53
  सूर्योदय : 5:45, सूर्यास्त : 7:04
  सूर्योदयकालीन नक्षत्र – मघ अहोरात्र, योग – वज्र 28:30, करण- बव 6:40, नंतर बालव 19:53 पश्चात कौलव
  राहुकाळ : स. 10:30 ते 12:00
  शुभ अंक : 6,3,9
  शुभ रत्न : शुक्रासाठी स्फटिक व हिरा
  शुभ रंग : निळा, लाल, गुलाबी

  दिनविशेष

  २३ जून घटना

  आंतरराष्ट्रीय विधवा दिन

  संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

  २०२२: शस्त्र अधिकार, अमेरिका – सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदूक आणि शस्रे वापरणे हा अमेरिकी नागरिकांचा अधिकार असल्याचे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले.
  २०१८: थायलंडमधील सॉकर संघातील बारा मुले आणि एक प्रशिक्षक पुराच्या गुहेत अडकले, १८ दिवसांचे बचाव कार्य सुरू होते.
  २०१७: पाकिस्तान दहशतवादी हल्ला – आंतकवादी हल्ल्याच्या मालिकेत किमान ९६ लोकांचे निधन तर किमान २०० लोक जखमी.
  २०१६: युरोपियन युनियन – युनायटेड किंग्डम युरोपियन युनियन मधून बाहेर.
  २०१६: युनायटेड किंगडम – देशाने युरोपियन युनियन सोडण्यासाठी सार्वमतात ५२% ते ४८% मते दिली.
  २०१३: निक वॉलेंडा – दोरीवर यशस्वीरित्या ग्रँड कॅन्यन ओलांडून चालणारे पहिले व्यक्ती बनले.
  २०१३: नांगा पर्वत अतिरेकी हल्ला – गिलगिट-बाल्टिस्तान, पाकिस्तानमधील नांगा परबत जवळील उंच पर्वतारोहण बेस कॅम्पवर अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यात १० गिर्यारोहक आणि एक स्थानिक मार्गदर्शक यांचे निधन.
  १९९८: दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
  १९९६: शेखहसीना वाजेद – बांगलादेशच्या पंतप्रधान.
  १९९४: NASA स्पेस स्टेशन प्रोसेसिंग फॅसिलिटी – आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी नवीन अत्याधुनिक इमारत, अधिकृतपणे केनेडी स्पेस सेंटर येथे उघडली.
  १९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.
  १९८५: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ, टोकियो – येथे दहशतवादी बॉम्बस्फोट.
  १९८५: एअर इंडिया फ्लाइट 182 – आतंकवादी बॉम्बचा स्फोट हल्ल्यात हे विमान कोसळले, त्यात ३२९ प्रवासी लोकांचे निधन.
  १९७९: क्रिकेट विश्वकप – वेस्ट इंडीजने इंग्लंडला पराभूत करून २री विश्वकप स्पर्धा जिंकली.
  १९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
  १९४२: दुसरे महायुद्ध – जर्मनीचे नवीन लढाऊ विमान, फॉके-वुल्फ एफडब्ल्यू 190 चुकून वेल्समधील आरएएफ पेम्ब्रे येथे उतरले तेव्हा ते अबाधित स्वरूपात पकडले गेले.
  १९४०: हेन्री लार्सन – यांनी व्हँकुव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा येथून नॉर्थ-वेस्ट पॅसेजची पहिली यशस्वी फेरी सुरु केली.
  १९२७: भारतीय नभोवाणी – मुंबई येथे सुरु.
  १९१३: दुसरे बाल्कन युद्ध – डोईरान लढाई: ग्रीक लोकांनी बल्गेरियनचा पराभव केला.
  १८९४: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती – स्थापना झाली.
  १८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स – यांना टाईप-राइटरचे पेटंट मिळाले.
  १७५७: प्लासीची लढाई – रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सिराज उद्दौला यांचा पराभव केला.

  २३ जून जन्म

  १९८०: रामनरेश सरवण – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू
  १९७२: झिनेदिन झिदान – फ्रेंच फुटबॉलपटू
  १९४८: नबरुण भट्टाचार्य – भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: ३१ जुलै २०१४)
  १९४२: जब्बार पटेल – दिग्दर्शक
  १९३६: कॉस्टास सिमिटिस – ग्रीक पंतप्रधान
  १९३५: राम कोलारकर – मराठी लेखक
  १९१६: लेन हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: ६ सप्टेंबर १९९०)
  १९०६: वीर विक्रम शाह त्रिभुवन – नेपाळचे राजे (निधन: १३ मार्च १९५५)
  १९०१: राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (निधन: १७ डिसेंबर १९२७)
  १८७७: नॉर्मन प्रिचर्ड – भारतीय-इंग्लिश अभिनेते (निधन: ३१ ऑक्टोबर १९२९)
  १७६३: जोसेफिन डी बीअर्नार्नास – नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी (निधन: २९ मे १८१४)

  २३ जून निधन

  २०२०: निलंबर देव शर्मा – भारतीय डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक – पद्मश्री (जन्म: ६ ऑक्टोबर १९३१)
  २००६: बुधी कुंदरन – भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २ ऑक्टोबर १९३९)
  २००५: डॉ. हे. वि. इनामदार – साहित्यिक
  १९९६: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ३ ऑक्टोबर १९२१)
  १९९५: जोनास साल्क – पोलिओची लस शोधणारे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ (जन्म: २८ ऑक्टोबर १९१४)
  १९९४: वसंत शांताराम देसाई – नाटककार, साहित्यिक
  १९८२: हरिभाऊ देशपांडे – नामवंत कलाकार
  १९८०: संजय गांधी – इंदिरा गांधी यांचा मुलगा (जन्म: १४ डिसेंबर १९४६)
  १९५३: श्यामा प्रसाद मुखर्जी – भारतीय जनसंघाचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९०१)
  १९३९: गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५)
  १९१४: भक्तिविनाडो ठाकूर – भारतीय गुरु आणि तत्वज्ञ (जन्म: २ सप्टेंबर १८३८)
  १८९१: विल्यम एडवर्ड वेबर – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
  १८३६: जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ६ एप्रिल १७७३)
  १७६१: नानासाहेब पेशवा – मराठा साम्राज्याचे ८वे पेशवा (जन्म: ८ डिसेंबर १७२०)
  ००७९: व्हेस्पासियन – रोमन सम्राट (जन्म: १७ नोव्हेंबर ०००९)