
ता. : 23 – 9 – 2023, शनिवार
तिथि: अष्टमी
मिती: राष्ट्रीय मिति 1, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी 12:17
सूर्योदयकालीन नक्षत्र:मूल 14:55, योग – सौभाग्य 21:29, नंतर शोभन, करण- बव 12:17, नंतर बालव 23:24, पश्चात कौलव
सूर्योदय:6:13, सूर्यास्त: 6:16
शुभ रंग: काळा, ग्रे, निळा
शुभ अंक: 8, 7, 4
शुभ रत्न: नीलम
दिनविशेष -23 सप्टेंबर घटना
आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन
2022: भूतान – कोरोना रोगामुळे दोन वर्षांच्या बंदीनंतर भूतानने आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटन पुन्हा सुरु केले.
2019: थॉमस कूक ग्रुप कंपनी – या प्रसिद्ध कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. किमान 6 लाख प्रवाशी ग्राहक जगभरात अडकले.
2004: जीन चक्रीवादळ, हैती – वादळामुळे किमान 3 हजार लोकांचे निधन.
2002: मोझिला फायरफॉक्स – ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
1983: संयुक्त राष्ट्र – सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
1943: दुसरे महायुद्ध – इटालियन सोशल रिपब्लिक म्हणून ओळखल्या जाणार्या नाझी कठपुतळी राज्याची स्थापना झाली.
1932: सौदी अरेबिया – हेझाझ आणि नेजडचे राज्य मिळून एकत्रीकरण पूर्ण झाले.
दिनविशेष -23 सप्टेंबर जन्म
2000: श्रेया अग्रवाल – भारतीय रायफल नेमबाज – सुवर्ण पदक
1957: कुमार सानू – पार्श्वगायक
1952: अंशुमन गायकवाड – भारतीय क्रिकेटपटू
1951: पी. आर. क्रिष्णा कुमार – भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक
1950: डॉ. अभय बंग – समाजशास्त्रज्ञ
1943: तनुजा – अभिनेत्री
1935: प्रेम चोप्रा – भारतीय अभिनेते
1920: भालबा केळकर – नाट्य लेखक व अभिनेते
1919: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ
1917: आसिमा चॅटर्जी – भारतीय रसायनशास्त्र – पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
दिनविशेष -23 सप्टेंबर निधन
2020: भूपेश पांड्या – भारतीय चित्रपट अभिनेते
2015: स्वामी दयानंद सरस्वती – भारतीय भिक्षू आणि तत्त्वज्ञ
2012: के. लाल – जादूगार
204: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष
1999: गिरीश घाणेकर – मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते
1964: मामा वरेरकर – नाटककार
1939: सिग्मंड फ्रॉईड – आधुनिक मानसशास्त्राचा जनक
1882: फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
1870: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
1858: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी