
ता. : 4 – 10 – 2023, बुधवार
तिथी: षष्ठी
मिती: राष्ट्रीय मिति 12, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष षष्ठी 29:41
सूर्योदय कालीन नक्षत्र : रोहिणी 18:28, योग – सिद्धि 6:41, नंतर व्यतिपात 29:44, करण- गरज 17:30, नंतर वणिज 29:41
सूर्योदय: 6.16, सूर्यास्त: 6.05
शुभ रंग : पांढरा, चंदेरी
शुभ अंक : 5, 1, 4
शुभ रत्न : बुधासाठी पन्ना
दिनविशेष 4 ऑक्टोबर घटना
जागतिक प्राणी दिन
2021: बब्बा वॉलेस – NASCAR प्रमुख शर्यत जिंकणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर बनले.
2006: विकिलिक्स – ज्युलियन असांज यांनी सुरु केले.
1992: रोम सामान्य शांतता करार – मोझांबिक देशातील 16 वर्षे चालू असणारे गृहयुद्ध संपले.
1991: अंटार्क्टिक करार – पर्यावरण संरक्षणाचा प्रोटोकॉल स्वाक्षरीसाठी खुला झाला.
1985: फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन – स्थापना झाली.
1963: फ्लोरा क्यूबा चक्रीवादळ – फ्लोरा क्यूबा आणि हैतीमध्ये किमान 6 हजार लोकांचे निधन.
1957: स्पुतनिक 1 – पृथ्वीभोवती फिरणारा पहिला कृत्रिम उपग्रह बनला. ह्या घटनेपासून अंतराळयुगाचा प्रारंभ झाला.
1943: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
1927: माऊंट रशमोअर – गस्टन बोरग्लम यांनी हे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
1917: पहिले महायुद्ध – ब्रूडसेइंडची लढाई: ब्रिटीश आणि जर्मन सैन्यांमध्ये फ्लँडर्समध्ये लढली गेली.
दिनविशेष 4 ऑक्टोबर जन्म
1997: रिषभ पंत – भारतीय क्रिकेटपटू
1945: सेदापट्टी मुथिया – भारतीय राजकारणी, खासदार
1937: जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री
1935: अरुण सरनाईक – मराठी चित्रपट अभिनेते, संगीतकार
1928: ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक
दिनविशेष 4 ऑक्टोबर निधन
2022: शेखर जोशी – भारतीय लेखक
2015: एडिडा नागेश्वर राव – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
2002: भाई भगत – वृत्तपट निवेदक
1993: जॉन कावस – अभिनेते
1989: पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट संगीतभूषण
1982: सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र
1966: अनंत अंतरकर – सत्यकथाचे संपादक, पत्रकार, कथाकार