
ता: 5 – 9 – 2023 मंगळवार
तिथी: षष्ठी
मिती: राष्ट्रीय मिति 14, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, षष्ठी 15:45,
सूर्योदयकालीन नक्षत्र: भरणी 8:59, नंतर कृतिका, योग- व्याघात 23:22, नंतर हर्षण, करण – वणिज 15:45, नंतर विष्टि 27:35, पश्चात बव,
सूर्योदय: 6:09, सूर्यास्त : 6:32
शुभ रंग: लाल, गुलाबी
शुभ अंक: 9, 3, 6
शुभ रत्न: मंगळासाठी प्रवाळ
दिनविशेष – 5 सप्टेंबर घटना – शिक्षक दिन
2022: लुडिंग काउंटी भूकंप – लुडिंग काउंटी, सिचुआन, चीनमध्ये 6.8 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात किमान 66 लोकांचे निधन तर किमान 250 जण जखमी झाले.
2005: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट 091 हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळून विमानातील 104 आणि जमिनीवरील 39 लोक ठार झाले.
2000: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
1984: एस. टी. एस. 41-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
1977: व्हॉयेजर 1 या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
1975: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.
1972: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
1970: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.
1967: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.
1961: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.
5 सप्टेंबर जन्म
1986: प्रग्यान ओझा – भारतीय क्रिकेटर
1967: कविता महाजन – भारतीय लेखिका आणि अनुवादक
1954: रिचर्ड ऑस्टिन – वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू
1948: बी. के. एस. वर्मा – भारतीय चित्रकार
1946: फ्रेडी मर्क्युरी – मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार
1940: रॅक्वेल वेल्श – अमेरिकन अभिनेत्री
1929: अँड्रियन निकोलायेव – सोव्हियेत युनियनचे अंतराळवीर, मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती
1928: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना – पद्मश्री
1920: लीलावती भागवत – बालसाहित्यिका
1910: फिरोझ पालिया – भारतीय क्रिकेट खेळाडू
1895: अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक
1888: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती – भारतरत्न
1872: व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई – भारतीय वकील आणि राजकारणी
5 सप्टेंबर निधन
2020: जॉनी बक्षी – भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते
2015: आदेश श्रीवास्तव – भारतीय गायक-गीतकार
2000: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
1997: मदर तेरेसा – समाजसेविका – भारतरत्न, नोबेल पुरस्कार
1996: बॅसिल सालदवदोर डिसोझा – भारतीय बिशप
1995: सलील चौधरी – हिंदी व बंगाली संगीतकार
1992: अतूर संगतानी – उद्योगपती
1991: शरद जोशी – हिंदी कवी, लेखक व उपहासकार
1978: रॉय किणीकर – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार
1918: सर रतनजी जमसेठजी टाटा – उद्योगपती
1906: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ