
घटना.
१७९२ : अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.
१९३४ : प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.
१९४२ : दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.
१९६४ : माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
१९६५ : गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९६८ : रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
१९७१ : बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९७६ : सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९८१ : बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.
१९८४ : ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९९१ : आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.