national tourism day

राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा करायला कधीपासून सुरूवात झाली ? राष्ट्रीय पर्यटन दिन २०२२ ची थीम काय आहे ? (National Tourism Day 2022) तसेच यामागचा उद्देश आज आपण जाणून घेऊयात.

    नवी दिल्ली : देशाच्या विकासात पर्यटनाचं (Tourism In India) मोठं महत्त्व आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व कळावे यासाठी भारत सरकारने पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय पर्यटनामुळे करोडो लोकांना रोजगार मिळतो, तसेच देशाचा जीडीपीही वाढतो. याशिवाय पर्यटन दिनाच्या माध्यमातून भारताची ऐतिहासिकता, सौंदर्य, निसर्गसौंदर्य, संस्कृती देश-विदेशात पोहोचवली जाते. राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा करायला कधीपासून सुरूवात झाली ? राष्ट्रीय पर्यटन दिन २०२२ ची थीम (Theme Of National Tourism Day 2022) काय आहे ?  (National Tourism Day 2022) तसेच यामागचा उद्देश आज आपण जाणून घेऊयात.

    जगभरात २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात असला तरी भारताचा पर्यटन दिवस २५ जानेवारीला आहे. या दिवसाची सुरुवात १९४८ मध्ये झाली, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. तीन वर्षांनंतर, म्हणजे १९५१ मध्ये, कोलकाता आणि चेन्नई येथील पर्यटन दिनाच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये वाढ झाली. दिल्ली, मुंबई व्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नई येथे पर्यटन कार्यालये सुरू करण्यात आली. वर्ष १९९८ मध्ये, पर्यटन आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पर्यटन विभाग जोडण्यात आला.

    उद्देश
    पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील त्याची भूमिका याविषयी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पर्यटन दिनाची सुरुवात करण्यात आली. जागतिक समुदायांमध्ये पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्य याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

    थीम
    राष्ट्रीय पर्यटन दिन २०२२ ची थीम ‘आझादी का अमृत महोत्सव’ अशी आहे. पर्यटन दिनाचा भारताच्या जीडीपीवर खोल प्रभाव पडतो. वर्षभर जगभरातून लोक भारतातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येतात, त्यामुळे भारताचा आर्थिक स्तर वाढतो. पर्यटन भारताच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे प्रतिबिंबित करते, ज्याला परदेशात प्रोत्साहन दिले जाते. भारतातील सुमारे ७.७ टक्के लोक पर्यटनातून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे रोजगार मिळतो.