एक किलो आंबा तयार होण्यासाठी लागते १८०० लिटर पाणी; जाणून घ्या पाण्याची निगडित रंजक तथ्य

सन २०१८ मध्ये जगाने 'डे झिरो' या संकल्पनेचा अनुभव घेतला दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात ऐतिहासिक जलसंकट कोसळले होते. परिस्थिती इथवर खालावली होती की, पिण्याचे पाणी पिण्यासाठी अक्षरशः कुपन वाटावे लागले होते. 

  संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ (world water day 2021)साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. २०२१ या वर्षी ‘पाण्याचे मूल्य’ ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे.

  जागतिक जल दिनानिमित्य आपण पाण्याची निगडित काही तथ्य आणि रंजक माहिती जाणून घेऊया.

  पृथ्वीचा ७१ टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे, परंतु फक्त ३ टक्के इतकेच पाणी पिण्यायोग्य आहे. उदाहणार्थ पृथ्वीच्या पूर्ण पाण्याला चार लिटरच्या जगमध्ये भरल्यास केवळ १ चमचा पाणी पिण्यायोग्य आहे.

  दैनंदिन जीवनात आपण वापरात असलेल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्याची निर्मिती करण्यासाठी हजारो लिटर पाणी खर्च झालेले असते, पण माहिती आणि जागरूकतेची अभावी आपण त्यांना वाया घालवतो. जसे

  १) १ किलो साखर तयार होण्यासाठी तब्बल १७२२ लिटर पाणी खर्च होते.

  २) १ किलो बटाटे तयार होण्यासाठी २८७ लिटर पाणी खर्च होते.

  ३) १८०० लॉटरी पाणी खर्च झाल्यानंतर १ किलो आंबा पिकतो.

  ४) २१४ लिटर पाणी खर्च झाल्यानंतर १ किलो टमाटर तयार होतात.

  ५) १ किलो तंतुल पिकवायला २४९७ लिटर पाण्याची गरज असते.

  ६) ८२२ लिटर पाणी १ किलो सफरचंद पिकविण्यासाठी खर्च होतात.

  सन २०१८ मध्ये जगाने ‘डे झिरो’ या संकल्पनेचा अनुभव घेतला दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात ऐतिहासिक जलसंकट कोसळले होते. परिस्थिती इथवर खालावली होती की, पिण्याचे पाणी पिण्यासाठी अक्षरशः कुपन वाटावे लागले होते.  आंघोळ कारण्यावरसुद्धा निर्बंध लादले गेले होते. याच वेळेस ‘डे झिरो’ ही संकल्पना समोर आली. देशातले अनेक देश हे ‘डे झिरो’ म्हणजेच पूर्णपणे पाणी संपण्याच्या उंबरठयावर आहेत.

  दुर्दैवाची बाब म्हणजे भारतही या यादीत समाविष्ट आहे. भारतात १३ राज्यातील ३०० जिल्हे पाण्यासाठी अक्षरशः लाचार झाले आहेत. पृथ्वीवरील एकूण जलसाठ्यापैकी केवळ ४ टक्के जलसाठा भारताच्या हद्दीत आहे, तर जगातल्या एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात आहेत.

  यापेक्षा अधिक धक्कादाय माहिती तर पुढे आहे. संपूर्ण जगात वपरल्या जाणाऱ्या २५ टक्के पाण्याचा वापर एकटा भारत करतो. मुख्य बाब म्हणजे केवळ ८ टक्के पावसाच्या पाण्याचा वापर होऊ शकत आहे. सद्यस्थिती लक्षात घेता २०३० पर्यंत भारतात ४० टक्के लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागेल.