०५ नोव्हेंबर : २०१३ साली भारताकडून ‘मंगळ ऑर्बिटर’ मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

    घटना.

    १८१७ : इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.

    १८२४ : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

    १८४३ : विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.

    १८७२ : महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

    १८९५ : जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.

    १९२९ : जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.

    १९४० : फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.

    १९४५ : कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

    १९५१ : बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.

    २००६ : इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

    २००७ : गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.

    २०१३ : भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.