१४ नोव्हेंबर : १९६९ साली दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना करण्यात आली.

    घटना.

    १७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.

    १९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

    १९४०: दुसरे महायुद्ध– जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

    १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

    १९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

    १९७५: स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.

    १९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

    २०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.