१९ सप्टेंबर; इतिहासात आजचा दिवस : २००७ साली टी-२० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

    घटना.

    १८९३ : न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

    १९५७ : अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्ब चाचणी केली.

    १९५९ : सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

    १९८३ : सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

    २००० : सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.

    २००१ : गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.

    २००७ : टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.