
घटना.
१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिओ
यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
१९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
१९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.
१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.