
घटना.
१६६४ : नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.
१८७३ : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१९३२ : पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
१९४६ : हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.
१९४८ : होंडा मोटार कंपनीची स्थापना.
१९६० : अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
१९७३ : गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
१९९४ : सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.
१९९५ : मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
१९९९ : कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
२००७ : कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
२०१४ : मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.
२०१५ : मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.