
घटना.
१७७७ : लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.
१८२१ : मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१८२५ : द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
१८५४ : एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.
१९०५ : आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
१९०८ : फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.
१९२५ : डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.
१९४० : जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० लोक ठार झाले.
१९५८ : मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.
१९६१ : सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९६ : तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.