३१ ऑक्टोबर : १८७६ साली भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २ लाख पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

    घटना.

    १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

    १८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

    १८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

    १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

    १९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

    १९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

    १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.

    १९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

    २०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.