दिनविशेष दि. ३१ मार्च; डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली

  घटना.

  १६६५ : मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

  १८६७ : डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

  १८८९ : आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

  १९०१ : पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

  १९६४ : मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

  १९६६ : रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

  १९७० : १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

  २००१ : सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.