२१ जून दिनविशेष; जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये

    घटना.

    १७८८ : न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

    १८९८ : अमेरिकेने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.

    १९४८ : चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.

    १९४९ : राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.

    १९५७ : एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

    १९६१ : अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.

    १९८९ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.

    १९९१ : पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान.

    १९९२ : डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.

    १९९५ : पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

    १९९८ : फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.

    १९९९ : विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ हा चौथा खेळाडू ठरला.

    २००६ : नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.

    २०१५ : जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.