२२ जून दिनविशेष; पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये

    घटना.

    १६३३ : गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

    १७५७ : प्लासीची लढाई सुरू झाली.

    १८९७ : पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.

    १९०८ : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण.

    १९४० : दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

    १९४० : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

    १९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

    १९७६ : कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.

    १९७८ : जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

    १९८४ : व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली.

    १९८६ : अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला.

    १९९४ : महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण.

    २००७ : अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.