२३ जून दिनविशेष; प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये

  घटना.

  १७५७ : प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.

  १८६८ : क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.

  १८९४ : पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.

  १९२७ : भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.

  १९६९ : आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.

  १९७९ : इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.

  १९८५ : दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.

  १९९६ : शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी नेमले.

  १९९८ : दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.

  २०१६ : युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.