मार्गशीर्षात करा; दुःख होतील दूर, ‘हे’ उपया केल्याने सुख-शांती लाभले

    भगवान श्रीकृष्ण मार्गशीर्ष महिन्याचे महत्व भगवद् गीतेतील श्लोकातून व्यक्त केले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘मसानां मार्गशीर्षोहं’ अर्थात मार्गशीर्ष हा महिना माझेच (भगवान श्रीकृष्णाचे) स्वरूप आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा आहे. भगवान श्रीविष्णुला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची मनोभावे पुजा केल्याने अगणित पूण्य प्राप्ती होते.

    यासह या महिन्यात रामरक्षा स्तोत्र, विष्णुसहस्त्र नामावली, भागवत ग्रंथ, भगवद् गीतेचे पारायण करावे. मार्गशीर्षातील गंगास्नानाचे पुण्य हे दहा लाख ग्रहण स्नानाएवढे मानले जाते.

    सृष्टीची उत्पत्ती हि शीर्ष मार्गाने होते. म्हणजेच अर्भक हे खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत जन्मास येते. अध्यात्मिक दृष्ट्या विचार केल्यास याच अवस्थेत जगत असते. गुरूचा अनुग्रह (गुरुमुखातून नाम मिळाल्यानंतर) मिळाल्यानंतर हे शीर्ष ऊर्ध्व होते. शीर्ष भागास मार्ग प्राप्त होतो.

    मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला हे व्रत करावे. या दिवशी आपल्या कुलस्वामिनीला पंचपक्वांन्नांचा नैवेद्य दाखवावा. भोपळ्याचे गोड घारगे बनवून त्याचा देखील नैवेद्य अर्पण करावा.मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायणाला विशेष महत्व आहे. या सप्ताहाला ‘श्री गुरुचरित्र सप्ताह’ असेही म्हणतात. यानंतर पुढील दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. आपल्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचे पारायण अवश्य करावे.

    एकदा तरी हे व्रत अवश्य करावे. मार्गशीर्ष सप्तमीला या व्रताचा प्रारंभ करावा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध सप्तमीस सूर्यपूजा तसेच उपवास करावा. या व्रतामुळे आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते.