रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ पदार्थ खाऊ नये…

  अनेकदा लोक रात्री झोपण्यापूर्वी चुकीच्या गोष्टींचे सेवन करतात, त्यामुळे त्यांना पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. आजचा लेख यासंबंधीतच आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खाऊ नये याबाबत सांगणार आहोत.

  रात्री झोपण्यापूर्वी अशा गोष्टी खाव्यात (Night Diet) ज्या खूप हलक्या असतात आणि जास्त तळलेल्या नसतात. पण अनेकदा लोक रात्री झोपण्यापूर्वी चुकीच्या गोष्टींचे सेवन (Eat at night) करतात, त्यामुळे त्यांना पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. आजचा लेख यासंबंधीतच (Healthy Diet) आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खाऊ नये याबाबत सांगणार आहोत.

  जास्त लिक्विड पदार्थ खाऊ नका
  रात्री झोपण्यापूर्वी लिक्विड आहार घेऊ नये. असे केल्याने रात्री वारंवार लघवी येण्याची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत द्रव आहार घेणे टाळावे.  रक्तदान केल्यानंतर ‘या’ वस्तू खा, जाणवणार नाही अशक्तपणा आणि थकवा

  मसालेदार पदार्थ खाणे टाळा
  रात्री झोपण्यापूर्वी मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मसालेदार अन्न खाल्ल्याने झोप आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या होऊ शकतात.

  थंड पदार्थांपासून दूर राहा
  रात्री झोपण्यापूर्वी थंडचविष्ट पदार्थं खाऊ नये. कारण थंडीचा प्रभाव असलेल्या पदार्थांमुळे सर्दीची समस्या होऊ शकते. त्यामुळे केळी, तांदूळ इत्यादी थंड वस्तू झोपण्याच्या 3 ते 4 तास आधी खाव्यात.

  दारू पिऊ नये
  रात्री झोपण्यापूर्वी दारू पिऊ नये. असे केल्याने झोपेवरही परिणाम होतो आणि त्या व्यक्तीला ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया आणि गंभीर घोरण्याची समस्या होऊ शकते.