कुत्रा चावल्यानंतर सर्वात पहिलं काय करावं? या बेसिक गोष्टी जाणून घ्या!

कुत्रा चावल्याने आपल्याला रेबीज होऊ शकतो. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.

    कुत्रा चावल्यावर या बेसिक गोष्टी करा : एका मुलाला कुत्र्याने चव घेतल्यामुळे मृत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. बऱ्याच वेळा रस्त्यावर फिरणारे कुत्रे असतात आणि ते बऱ्याचवेळा मोकाट फिरत असतात. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर काय काळजी घेणे गरजेचे आहे हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. कारण कुत्रा चावल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या आजार निर्माण होऊ शकतात. जर आपल्याला कुत्रा चावल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रथमोपचार करणे फार गरजेचे आहे. तर कुत्रा चावल्यानंतर सर्वात आधी जखम पंधरा मिनिटे स्वच्छ धुवावी त्यानंतर जखमेवर मलमपट्टी बांधावी. या उपचारानंतर तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार आणि सल्ला घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचा रेबीज पासून बचाव होईल.

    आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे की कुत्रा फक्त चावला तरच रेबीज होतो असं नाही तर कुत्र्याने ओरबाडल्यानंतर देखील रेबीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर कुत्रा चावला किंवा ओरबडला तर तातडीने डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या सूचनेनुसार लसीकरण करणे देखील गरजेचे आहे. कुत्रा चावल्यानंतर सगळ्यात आधी झालेल्या जखमेवर निर्जंतुक पट्टी बांधणे गरजेचे आहे. झालेल्या जखमेवर मलम पट्टी करावी आणि त्यानंतर डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.

    कुत्रा चावल्याने आपल्याला रेबीज होऊ शकतो. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. पण आजकाल बहुतेक लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांचं लसीकरण करतात त्यामुळे रेबीज होण्याची शक्यता कमी असते. परंतु काही भटक्या कुत्र्यांमध्ये रेबीजची शक्यता असते त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर आपल्याला रेबीज होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांचे योग्य तो सल्ला घेणे गरजेचे आहे. कुत्रा चावल्यानंतर २४ तासांच्या आत इंजेक्शन घेणे फार गरजेचे असते. त्यामुळे कुत्रा चालल्यानंतर पाच इंजेक्शन घेणे गरजेचे असतं. हे इंजेक्शन पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि त्यानंतर सातव्या दिवशी तसेच चौदाव्या दिवशी आणि शेवटी २८ व्या दिवशी दिले जाते.