‘हे’ उपाय करा झुरळांपासून कायमची सुटका मिळवा

    आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येक स्त्री यासाठी विशेष लक्ष असते. पण काहीवेळा कितीही स्वच्छता ठेवली तरी घरात झुरळ हे होतात, अशावेळी घरात झुरळांचा वावर वाढला तर ते फार किळसवाणे वाटते, कारण झुरळांचा मुख्य वावर स्वयंपाक घरात असतो. या समस्येवर सोप्पा उपाय उपलब्ध आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही अशा झुरळांच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.

    कडुलिंबाच्या तीव्र वासाने झुरळांसह अनेक प्रकारचे कीटक घरापासून दूर ठेवण्यास मदत मिळते. यासाठी कडुलिंबाच्या तेलात कापूस बुडवून जिथे झुरळ दिसतील तिथे ठेवा.

    झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी माउथवॉश हा देखील प्रभावी उपाय आहे. यासाठी माऊथवॉश आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि झुरळांच्या लपण्याच्या जागेवर हे मिश्रण शिंपडा.

    घरात असलेल्या झुरळांना मारण्यासाठी आणि त्यांची वाढ रोखण्यासाठी पेपरमिंट तेल खूप प्रभावी मानले जाते. यासाठी हे तेल पाण्यात मिसळून सर्व ठिकाणी शिंपडा.

    खास टिप्स – स्वयंपाक घरात कोणते अन्न पदार्थ सांडले असल्याल किंवा पडले असल्यास त्याची नीट स्वच्छता करून घ्या. अन्न पदार्थच्या वासाने झुरळाचा मोठ्या प्रमाणात शिरकान होतो.