शरीरात पाणी आणि मीठाचे प्रमाण जास्त झालेय? तुम्हालाही असू शकते वॉटर रीटेन्शनची समस्या; जाणून घ्या कारणे आणि परिणाम

या कारणामुळे शरिराच्या विविध भागात अंगदुखी आणि सूज येण्याची समस्या उदभवू शकते. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांच्या हाता-पायावर सूज येते. ही लक्षणे या आजारपणाचाच भाग आहेत.

    आपले वजन (Weight) अचानक वाढू लागले किंवा पाय, गुडघेदुखी होण्याबरोबरच चेहरा, हात आणि पोटावर सूज येऊ लागली तर ही समस्या वॉटर रिटेन्शनशी (Water Retention) निगडीत असू शकते. या आजारात शरीराच्या आतील भागात पाणी जमा होते. याचाच अर्थ शरीरात पाणी आणि मिठाचे प्रमाण अधिक असणे (This means more water and salt in the body). या कारणामुळे शरिराच्या विविध भागात अंगदुखी आणि सूज येण्याची समस्या उदभवू शकते. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांच्या हाता-पायावर सूज येते. ही लक्षणे या आजारपणाचाच भाग आहेत.

    जेवणात नको अधिक मीठ

    शरीरात अशा प्रकारचे बदल हे हार्मोनल किंवा जेवणात गरजेपेक्षा अधिक मीठ तसेच दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसण्याच्या कारणावरून देखील होऊ शकते. शरीरातील अतिरिक्त पाणी टिश्यूत भरले जाते आणि शरीराचे बाह्य ऑर्गन्स फुगल्यासारखे वाटतात. परिणामी हे आजारपण फैलावू शकते. आपल्याही ही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

    जीवनशैली बदला

    जीवनशैलीत बदल करून या आजारावर नियंत्रण ठेवू शकतो. सर्वांत अगोदर म्हणजे आपण बाहेरचे जेवण टाळायला हवे. बाहेरच्या जेवणात किंवा आहारात गरजेपेक्षा अधिक मीठ असते. दुसरे म्हणजे बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहण्याऐवजी एक निश्चित काळापर्यंत चकरा, फेऱ्या मारणे गरजेचे आहे. कार्यालयात काम करताना चहाच्या निमित्ताने ऑफिसबाहेर रपेट मारायला हवी.

    नियमित व्यायाम

    शरीरात पाणी आणि मीठ वाढू नये यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करावा. नियमित व्यायाम करण्याची सवय ठेवावी. आपण मद्यपान करत असाल तर त्याचे सेवन तत्काळ बंद करावे. डॉक्टराच्या सल्ल्यांशिवाय कोणतेही औषध घेणे हानीकारक ठरू शकते. आहार आणि वजन संतुलित ठेवल्यास अशी समस्या निर्माण होत नाही. परंतु समस्या वाढल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.