तुम्हाला डास खूप जास्त चावतात का? कारण जाणून घ्या

    एखाद्या ठिकाणी एकत्र जमलेल्या लोकांपैकी काही लोकांना डास चावतात आणि काहींना मात्र त्यांचे अस्तित्व जाणवतही नाही. काहीकडे असं बोल जात ज्याच अंग गोड आहे त्याला डास जास्त चावतो. खरेच इतरांपेक्षा अधिक डास का चावतात, जाणून घ्या. डास सहसा मानवाकडे फारसे आकर्षित होत नाहीत.

    फक्त डासाची मादी चावते आणि तेही अंडी योग्यपणे घालण्यासाठी शरीरात पोषक द्रव्य मिळवण्यासाठी ती चावण्यायोग्य प्राणी शोधते. गडद रंगाचे कपडे, आकार, हलत्या वस्तू डासांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात. सहसा लोकसंख्येपैकी २० टक्के लोकसंख्येला सरासरीपेक्षा जास्त डास चावतात.

    डास आकर्षित होणे ही गोष्ट सुमारे ८५ टक्के अनुवांशिक असते. रक्ताचा प्रकार, त्वचेवरील लॅक्टिक ऍसिड किती प्रमाणात तयार होते यावर डास तुमच्याकडे आकर्षित होतात. लठ्ठ व्यक्ती उच्छवासातून कार्बन डायऑक्साईड अधिक प्रमाणात बाहेर सोडतात, त्यामुळे त्यांना डास चावण्याचा धोका जास्त आहे. ए किंवा बी रक्तगटाच्या तुलनेत ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना किंवा शरीराचे तापमान जास्त असलेल्या व्यक्तींना डास चावण्याचा धोका अधिक असतो.

    आंघोळ न करणे, अस्वच्छ कपडे घालणे यामुळे मलेरिया वाहक डास आकर्षित होण्याचा धोका वाढतो. घाम येत नसेल आणि श्वासाचा वेग अधिक नसेल तर तुम्हाला कमीत कमी डास चावतील. असे देखील म्हटल जात की रक्त गटानुसार डास हे आकर्षित होतात, डास हे एबी या रक्त गटातील लोकांना जास्त चावता. डास जास्त चावणे चांगले नसते त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. डास चावल्याने अंग दुखी, उलटी मळमळ या सारखे लक्षणे दिसू लागतात.  डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या, हत्तीपाय यांसारख्या डास आपल्या अरोग्यासाठी घातक असतात.