चहा पिल्यानंतर तुम्हाला पाणी पिण्याची सवय आहे? मग ‘हे’ नक्की वाचा

  अनेकांना चहा पिल्यावर पाणी पिण्याची सवय असते, आपण हे नेहमी ऐकत असतो की चहा पिल्यावर पाणी पिऊ नये. ही पाणी पिण्याची सवयी तुमच्या शरीरीवर मोठा परिणाम करू शकते.  चला तर मग जाणून घेऊ.

   

  • चहा पिल्यानंतर पाणी पिल्याने दांतांना धोका पोहोचतो. चहावर पाणी पिल्याने त्याचा थेट प्रभाव तुमच्या दातांवर होतो. दातांच्या बाहेरील लेयरवर गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने दातांच्या इनॅमलवर त्याचा प्रभाव पडतो. गरम चहानंतर लगेच दातांना थंड जाणवल्याने तुमचं इनॅमल डॅमेज होतं. चहावर पाणी पिल्याने हिरड्याही कमजोर होते. त्याने सेंसिटीव्हीटीचाही त्रास होतो.
  • चहानंतर पाणी पिणे पचनशक्तीसाठीही हानिकारक ठरते. चहावर पाणी पिल्याने अल्सरचा धोका वाढतो. चहावर थंडगार पाणी पिल्याने लोकांमध्ये अॅसिडीटीचा धोका वाढतो. या त्रासाचे रुपांतर पुढे अल्सरमध्ये होते.सर्दी तापाच्या समस्या
  • वातावरणातील बदलामुळे सर्दी आणि तापाच्या समस्या उद्भवतात. शरीरातील तापमानाच्या बदलामुळे या समस्या जाणवतात. चहावर पाणी प्यायल्याने अचानक तापमानात बदल होतो. याच कारणाने गळ्यात खरखर जाणवते.
  • गर्मीमध्ये अनेक लोकांना नाकातून ब्लिडिंग जातं. यामागे उष्णता हे कारण नसून गरम आणि थंड तापमानाच्या एकत्रित बदलाचं हे कारण आहे. त्यामुळे चहावर गरम चहावर थंड पाणी प्यायल्याने ब्लिडींगची समस्या निर्माण होते.