मंदिरात घंटा का वाजवतात ‘हे’ आहे कारण, घंटेच्या आवाजाने देवता प्रसन्न होऊन भक्तांवर करतात कृपेचा वर्षाव ; जाणून घ्या सविस्तर

असं मानतात की, घंटा वाजविल्याने मंदिरात स्थापित देवी-देवतांच्या मूर्त्यांमध्ये चेतना जागृत होते, यानंतर त्यांची पूजा आणि आराधना अधिक फलदायक आणि प्रभावशाली होते.

    जेव्हा कधी आपण मंदिरात जातो तोव्हा मंदिरात प्रवेश करण्याआधीच त्या ठिकाणी असलेल्या घंटा(Temple bells) आपण वाजवूनच आत प्रवेश करते होतो, घंटा वाजविण्याची परंपरा काही नवीन परंपरा नाही,तर ती वर्षानुवर्षे चालत आलेली एक परंपरा आहे, जी आजही कायम आहे, पण आता प्रश्न असा आहे की, अखेरीस मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा का वाजवितात? याचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेऊया…

    असं मानतात की, घंटा वाजविल्याने मंदिरात स्थापित देवी-देवतांच्या मूर्त्यांमध्ये चेतना जागृत होते, यानंतर त्यांची पूजा आणि आराधना अधिक फलदायक आणि प्रभावशाली होते.

    जाणकार सांगतात की, मंदिरात घंटा लावण्यामागे फक्त धार्मिक कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा घंटा वाजवितात तेव्हा वातावरणात कंपने निर्माण होतात, जी वायुमंडळाच्या कारणामुळे खूप दूरवर जातात. या कंपनांचा फायदा असा आहे की, याची मर्यादा येणारे जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्मजीव आदी नष्ट होतात, ज्यामुळे मंदिर आणि त्याच्या आसपासचे वातावरण शुद्ध होते.
    असंही म्हणतात की, अनेकदा मंदिरातील देवता सुप्तावस्थेत असतात अशातच घंटा वाजवून प्रथम त्यांना जागवायला हवं आणि त्यानंतर त्यांची पूजा करायला हवी.

    असं म्हणतात की, देवतांच्या प्रसन्नतेसाठी घंटा वाजविणं शुभ असतं, मान्यतेनुसार, देवी-देवतांना घंटा, शंख आणि घडयाळ इत्यादींचा आवाज खूपच प्रिय आहे. असं म्हणतात की, घंटेच्या आवाजाने देवता प्रसन्न होऊन देवता भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात.

    अशीही मान्यता आहे की, ज्या ठिकाणी घंटा वाजविण्याचा आवाज कायम येतो, तेथील वातावरण नेहमी शुद्ध आणि पवित्र राहते, असंही मानतात की, घंटा वाजविल्याने नकारात्मक शक्ती त्या ठिकाणाहून दूर जातात, ज्यामुळे लोकांचा समृद्धीचा मार्ग अधिक प्रशस्त होतो.

    शास्त्रांनुसार, मंदिरात घंटा वाजविल्याने माणसांची अनेक जन्मांची पापे नष्ट होतात, असं म्हणतात की, जेव्हा सृष्टीचा प्रारंभ झाला, तेव्हा जो नाद (आवाज) ऐकला होता, तोच आवाज घंटा वाजविल्यानंतरही येतो. घंटा त्याच नादाचं प्रतिक आहे.