तुम्ही सर्दी-खोकला झाला की अँटिबायोटिक्स खाता? मग ‘हे’ नक्की वाचा

  भारतातील लोक स्वतःचा विचार न करता औषधे घेतात आणि त्यामुळे होणाऱ्या हानीकडे लक्ष देत नाहीत, हेही समोर आले आहे. तुम्ही अखेरच्या वेळी अँटीबायोटिक्स घेतल्याबद्दल विचार करा. सर्दी-खोकला झाल्यावर जवळच्या मेडिकल दुकानातून घेतली होती किंवा घरी ठेवलेली घेतली होती. जाणून घेऊयात अँटीबायोटिक्स कधी घ्यावीत, केव्हा घेऊ नये

  अँटीबायोटिक्सचा वापर जिवाणू संसर्गावर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. ही औषधे जीवाणू मारून त्याचा प्रसार रोखण्याचे काम करतात. व्हायरल इन्फेक्शन म्हणजे सर्दी, फ्लू, घसा खवखवणे. बर्‍याच सौम्य जिवाणू संसर्गांना अँटीबायोटिक्सची आवश्यकता नसते.

  • प्रत्येक रोग आणि आजारात याचा वापर करू नका.
  • संसर्ग कसा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
  • डोस आणि कालावधी निश्चित केला पाहिजे.
  • एकदा तुम्ही अँटीबायोटिक्स घेतल्यावर कोर्स पूर्ण करा.
  • मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित काही समस्या असल्यास, ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  विशिष्ट रोगासाठी समान अँटीबायोटिक्स दिले जाऊ शकतात?

  • किडनीचा आजार असलेले
  • लहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देऊ नये.
  • ज्या लोकांना अँटीबायोटिक्सची अ‍ॅलर्जी असेल
  • हृदयरोग असणारे रुग्ण
  • वृद्धांना कमी डोस द्यायला हवा