
थंडी हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. अशात थंडीपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करत असतो. गरमी निर्माण होण्यासाठी विविध पर्यातचा अवलंब करत असतो. उदा-शेकोटी, शाल-स्वेटर इत्यादी गोष्टी…पण अनेकांच्या घरी रुम हीटर वापरला जातो. ज्यामुळे थंडीपासून संरक्षण करता येईल. पण तुम्हाला माहिती आहे का याच रुम हीटरचा तुमच्या जीवालाही धोका?
- रूम हीटरमधून बाहेर पडणारी कोरडी हवा आपल्या स्किनसाठी हानिकारक असते. त्यामुळे त्वचेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
- स्कीन कोरडी पडणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी समस्या होऊ शकतात.
- हीटरमधून पडणाऱ्या विषारी हवेमुळे श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. ज्यामुळे दमा किंवा हार्टचा आजारही होऊ शकतो.
- याशिवाय या विषारी हवेमुळे घसा वारंवार कोरडा पडू शकतो तर जळजळ होणे, लंग्समध्ये त्रास होणे, इत्यादी आजार होऊ शकतात.
- याशिवाय या विषारी हवेचा त्रास तुमच्या डोळ्यालाही होऊ शकतो ज्यामुळे डोळ्यामध्ये जळजळ होणे, खाज सुटणे इत्यादी त्रास होऊ शकतो.
काळजी घ्या
- हिटर वापरण्यापूर्वी स्कीनला चांगले मॉइश्चरायझ लावा.
- हीटरच्या खूप जवळ बसू नका
- सायनस असलेल्या लोकांनी हिटर वापरताना ह्युमिडिफायरचा वापर करावा.
- ऑइल हिटरचा वापर करा
- रात्री चुकूनही हीटर लावून झोपू नका.