चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही क्रीम वापरता का? क्रीम लावण्यापूर्वी ‘अशी’ काळजी घ्या

क्रीम लावल्याने त्वचा केवळ हायड्रेट होत नाही तर त्वचा सुंदर आणि मुलायम सुद्धा होते. उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगपासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर क्रीम लावणे आवश्यक आहे.

  वातावरणातील बदलांमुळे आणि वाढत्या उन्हामुळे बऱ्याचदा त्वचा टॅन होते. वातावरणामध्ये सतत बदल होत असतात. विशेषता उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण बाजारात मिळणारे महागडे क्रीम आणून वापरतो. त्वचेवर क्रीम लावणे देखील गरजेचे आहे.क्रीम लावल्याने त्वचा केवळ हायड्रेट होत नाही तर त्वचा सुंदर आणि मुलायम सुद्धा होते. उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगपासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर क्रीम लावणे आवश्यक आहे. पण त्वचेवर क्रीम लावण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचता येईल. त्वचेवर कोणतीही क्रीम लावण्यापूर्वी का काळजी घ्यावी चला तर जाणून घेऊया.

  त्वचा स्वच्छ करणे:

  उन्हाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये त्वचेला क्रीम लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यावर कोणतेही क्रीम लावणे. असे केल्यास त्वचेवरील घाम, घाण, धूळ आणि मेकअप काढून टाकण्यास मदत होईल. त्वचा पाण्याने धुतल्यानंतर पातळ कपड्याने पुसणे गरजेचे आहे. असे न केल्यास चेहऱ्यावर रॅशेस किंवा चेहरा लाल होऊ शकतो. चेहरा स्वच्छ केल्यानंतर कोणतेही क्रीम लावल्यास त्याचा प्रभाव जास्त काळ टिकतो.

  फ्रेश क्रीम लावणे:

  चेहऱ्यावर लावण्यासाठी घेतलेले क्रीम हे योग्य दर्जाचे आणि ताजे असले पाहिजे. अन्यथा चेहरा खराब होऊ शकतो. जुने किंवा खराब झालेले क्रीम त्वचेला लावल्यानंतर चेहरा लाल किंवा डाग येण्याची शकता असते.

  पॅच चाचणी:

  त्वचेवर कोणतेही क्रीम लावण्यापूर्वी त्याची पॅच चाचणी करणे आवश्यक आहे. पॅच चाचणी केल्यानंतर ऍलर्जी आहे की नाही हे कळू शकेल त्यामुळे पॅच चाचणी करणे गरजेचे आहे. त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन किंवा लालसरपणा दिसल्यास ते क्रीम वापरू नये.

  हलक्या हाताने मसाज करणे:

  चेहऱ्याला क्रीम लावल्यानंतर त्वचेची हलक्या हाताने मसाज केल्यास रक्तभिसरण होते. त्वचेवर कोणतीही क्रीम किंवा इतर कोणते प्रॉडक्ट लावताना ते हलक्या हाताने लावावे. हलक्या हाताने क्रीम लावल्याने ती जास्त वेळ त्वचेवर टिकून राहते.

  सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा:

  नेहमी चेहरा धुवण्यासाठी साध्या पाण्याचा वापर करा. गरम पाण्याचा वापर केल्याने त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करावा. त्वचेसंबंधित समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम वापराव्यात.