उन्हाळ्यात शरीराला सतत घाम येतो? तर ‘हे’ घरगुती उपाय केल्याने लवकर मिळेल आराम

उन्हाळ्यात घाम आल्यानंतर तुमच्या त्वचेला सतत खाज येत असेल तर घरातून बाहेर उन्हात जाणे टाळले पाहिजे.

  सध्या देशभरात सगळीकडे उन्हाळा (Summer) मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या वाढत्या उन्हाचा परिणाम त्वचा, केस, आरोग्यावरसुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उन्हाळ्यात जाणवू लागतात. उन्हामध्ये थोडा वेळ बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच घाम येण्यास सुरुवात होते. घामामुळे त्वचे संबंधित आजार वाढण्याची शक्यता असते. त्वचेवर पुरळ येणे. खाज येणं यांसारख्या समस्या जाणवू लागतात. सतत खाज आल्याने शरीरावर डाग आणि त्वचा लाल होण्याची शक्यता असते.

  उन्हाळ्यात घाम आल्यानंतर तुमच्या त्वचेला सतत खाज येत असेल तर घरातून बाहेर उन्हात जाणे टाळले पाहिजे. तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये औषधी वनस्पती किंवा घरगुती गोष्टींचा वापर केल्याने अनेक फायदे होतात.उन्हाळ्यात येणाऱ्या खाजीपासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून पाहा. यामुळे त्वचेसंबंधित आजार बरे होण्यास मदत होईल.

  तुळस आणि कोरफड:

  कोरफड आणि तुळस त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या दोन्ही औषधी वनस्पती आहेत. याचा वापर केल्याने अनेक आरोग्यासंबंधित समस्या बऱ्या होतात. त्वचा आणि केसांसंबंधित समस्या जाणवत असतील तर तुम्ही कोरफड किंवा तुळशीचा वापर करू शकता. अंघोळीच्या पाण्यात कोरफडचा गर टाकून अंघोळ केल्याने त्वचेची समस्या दूर होते. यामुळे त्वचा हायड्रेट राहून खाज कमी होते.

  हळद दुधाची पेस्ट:

  मसाल्यांच्या पदार्थामध्ये हळदीचा वापर विशेषता सर्वच पदार्थांमध्ये केला जातो. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. जेवणाची चव वाढण्यासोबतच आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या दूर करण्यासाठी हळद उपयोगी आहे. उन्हाळ्यात घामामुळे तुमच्या अंगाला सतत खाज येत असेल तर तुम्ही २ चमचा हळद पावडर मध्ये थोडं दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून शरीराला लावू शकता.पेस्ट लावून झाल्यानंतर ५ ते ६ मिनिट ठेवून नंतर धुवून टाका. यामुळे शरीराची खाज कमी होईल.