पायाच्या घोट्याची त्वचा सतत काळी पडते का? स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा

हायपरपिग्मेंटेशन, हार्मोन्स असंतुलन आणि त्वचेवरचे टॅनिंग वाढल्यानंतर घोट्यांचा काळेपणा वाढू लागतो. घोट्यांसोबत आजूबाजूची त्वचा देखील काळी पडण्यास सुरुवात होते.

  दिवसभर पायामध्ये शूज घातल्यानंतर आपण पाय स्वच्छ करायचे विसरून जातो. यामुळे बऱ्याच वेळा पायाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. पाय स्वच्छ करायला वेळ भेटत नाही. दिवसभर पायामध्ये शूज राहिल्याने त्वचेमध्ये मृत त्वचेच्या पेशी जमा होऊ लागतात. त्यामुळे पायाचे घोटे काळे पडतात. घोट्यांमध्ये काळेपणा वाढत जातो. काळेपणा वाढल्यानंतर तो आजूबाजूला पसरण्यास सुरुवात होते. त्यामुळे पायांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. या समस्येपासून तुम्हाला जर आराम मिळवायचा असेल तर काही घरगुती उपाय केल्याने घोट्यांचा काळेपणा कमी होतो. घोट्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा.

  हायपरपिग्मेंटेशन, हार्मोन्स असंतुलन आणि त्वचेवरचे टॅनिंग वाढल्यानंतर घोट्यांचा काळेपणा वाढू लागतो. घोट्यांसोबत आजूबाजूची त्वचा देखील काळी पडण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यात अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने घोट्याच्या आणि आजूबाजूची त्वचा काळी पडण्याची समस्या वाढू लागते. यावर आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याचे तेल, कोरफडचा जेल यांसारखे घरगुती उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता. शिवाय, एलोवेरा जेल आणि हळद त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे.

  कोरफड जेल:

  कोरफड जेल त्वचेवर अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायी आहे. त्वचेमध्ये अतिरिक्त रंगद्रव्य वाढण्याच्या समस्येला हायपरपिग्मेंटेशन असे म्हणतात. मेलॅनिन पेशींच्या वाढीमुळे त्वचेवर काळोख वाढत जातो. यावर कोरफड फायदेशीर आहे. कोरफड जेलमध्ये त्वचेच्या आवरणाचे गुणधर्म आढळून येतात. एलोइन आणि एलोसिनचे प्रमाण त्वचेवर वाढणारा काळेपणा दूर करण्यास कोरफड जेल मदत करते. कोरफड जेल लावताना आधी पाय स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरफड जेलचा जाड थर घोट्याना लावा आणि सकाळी उठल्यावर धुवून टाका.

  बेकिंग सोडा:

  बेकिंग सोड्यामध्ये एक्सफोलिएटिंगचे गुणधर्म आढळतात. पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून घट्ट द्रावण तयार करून ते घोट्याना लावा. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होऊन त्वचेचा रंग सुधारेल. 10 ते 15 मिनिटे लावल्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. बेकिंग सोडामध्ये आढळणारे ब्लीचिंग गुणधर्म त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करतात.

  खोबरेल तेल:

  नारळाच्या तेल मॉइश्चरायझिंग गुणधर्मांनी समृद्ध असते. यामुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळता येते. नारळाचे तेल लावल्याने त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढू लागते आणि त्वचेची लवचिकता टिकून राहते. त्वचेवरील काळेपणाची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलाने आपल्या घोट्याची मालिश करा आणि रात्रभर तेल तसेच ठेवा. यामुळे घोट्यांवरील काळेपणा दूर होऊन त्वचा मुलायम होईल.

  हळद आणि बेसन:

  हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात. एक चमचा बेसनमध्ये चिमूटभर हळद टाकून त्याची जाडसर पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर ती घोट्याला लावा. रात्रभर लावून ठेवल्यानंतर सकाळी पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेवरील काळेपणा कमी होईल. घोट्याची आणि त्याच्या सभोवतालची त्वचा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.