रोज दारापुढे रांगोळी काढा कधीच होणार नाही लक्ष्मीचा कोप

    आता फक्त सण, शुभ प्रसंग आणि लग्नात वगैरे रांगोळी काढली जाते; बाकी इतर वेळी कोणीही आपल्या दारापुढे रांगोळी काढत नाही. फ्लॅट सिस्टीममुळे दारापुढे तेव्हढी जागाही तिथे नसते. त्यामुळे रांगोळी काढणं शक्य होत नाही. पण रोज सकाळी बाहेरचं अंगण झाडून रांगोळी काढली तर घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो; घरात सकारात्मक शक्ती वाढते.

     

    १. घरात शांततेचं आणि समाधानाच वातावरण राहत

    रांगोळी ही खूप शुभ मानली जाते, दारापुढे रांगोळी काढली की घरात येणारे ऊर्जेचे दूत घरात समाधान आणि शांतता घेऊन येतात, शिवाय तिने फार प्रसन्नही वाटते.

    २. बाहेरून येणाऱ्यांचे वाईट विचार बाहेरच राहतात.

    असं म्हणणं आहे की रांगोळी काढल्याने बाहेरची व्यक्ती जी घरात येणार आहे तिच्या मनातले वाईट विचार बाहेरचं राहतात आणि ती चांगल्या मनाने घरात येतात.

    ३. लक्ष्मी देवी होते प्रसन्न

    लक्ष्मी देवीला घाण कचरा अजिबात आवडत नाही; जे घर स्वच्छ असते तिथे लक्ष्मी देवी नेहमी वास करते; दारापुढे रांगोळी काढून एका पद्धतीने आपण तिला निमंत्रित करतो आणि त्यामुळे ती प्रसन्न होते.

    ४. थकवा दूर होतो

    तुम्ही कितीही थकून भागून घरी या; आल्यावरती दारात रंगबेरंगी रांगोळी बघून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही; त्या रांगोळीमुळे तुमचे मन क्षणार्धात प्रसन्न होईल आणि थकवाही दूर होईल. त्यामुळे रोज दारापुढे छोटीशी का होईना पण रांगोळी काढावी, हल्ली बाजारात मिळणारे छापही तुम्ही काढू शकतात किंवा उंबऱ्यावरती स्वतीक, गोपद्म, लक्ष्मी पद्म देखील काढू शकतात.