वारंवार गरम पाणी पिताय? मग सावधान तुम्हाला होऊ शकेल ‘हा’ गंभीर आजार

    मुंबई : कोरोना महामारीपासून बचावण्यासाठी अनेक जणांना दररोज गरम पाणी पिण्याची सवय लागली होती. आता कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक लोक उकळलेले गरम पाणी पिण्यास प्राधान्य देतील. मात्र असे गरम पाणी वारंवार प्यायल्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

    1. पाणी उकळण्याच्या चुकीमुळे पाण्यात आर्सेनिक, नायट्रेट आणि फ्लोराईडचे प्रमाण खूप वाढते आणि त्यामुळे अनेक घातक पदार्थ पाण्यात शिरतात.
    2. तज्ज्ञांच्या मते, नळाचे पाणी पुन्हा उकळल्याने कर्करोग, हृदयाच्या समस्या, किडनीच्या समस्या तसेच मानसिक विकारांसारखे अनेक आजार होऊ शकतात.
    3. पाणी उकळल्याने त्यातील रसायने बदलतात आणि त्यामुळे तेच पाणी पुन्हा पुन्हा उकळल्याने त्यात विरघळलेल्या क्षारांची संख्या वाढते.
    4. पाण्यातील अनेक क्षार आणि रसायने शरीरासाठी फायदेशीर असतात. मात्र, अनेकदा पाणी उकळल्याने पाण्यात हानिकारक रसायने निर्माण होतात. ज्यामुळे कॅन्सर, नॉन-हॉजकिन लिम्फोमा यांसारखे अनेक गंभीर आणि घातक आजार होऊ शकतात.
    5. पाणी वारंवार गरम केल्याने पाण्यातील चांगली रसायने निघून जातात आणि हानिकारक रसायनांची निर्मिती होते. पाणी जास्त उकळल्याने त्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते. पाण्यातील नायट्रेट्सचे नायट्रोसमाइनमध्ये रूपांतरित झाल्यास कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
    6. पाणी जास्त उकळल्याने आर्सेनिकचे प्रमाण वाढते. अधिक आर्सेनिकयुक्त पाणी प्यायल्याने कर्करोग, हृदयविकाराचा झटका आणि अनेक प्रकारच्या मानसिक आजारांचा धोका वाढतो. वर्षानुवर्षे आर्सेनिकयुक्त दूषित पाणी पिणाऱ्या व्यक्ती त्वचेशी संबंधित अनेक आजारांना बळी पडतात.

    (वरील लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर आहे. अधिक माहिसाठी तुम्ही तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)