धक्कादायक! काय म्हणायचं नवऱ्याच्या या वागण्याला : पतीला आहे झोपेत से क्स करण्याचा आजार, महिलेने सांगितली आपबीती

महिलेने एका पॅरेंटिंग फोरमला सांगितले की, तिचा पती कशाप्रकारे दुर्मिळ विकारामुळे झोपेतच तिला पलंगावरच जवळ ओढतो, तिचे कपडे खेचतो आणि जबदस्ती तिच्यासोबत से क्स करण्याचा प्रयत्न करतो. महिला जवळपास गेल्या १० वर्षांपासून तिच्या पतीसोबत रहात आहे.

    से क्सो मेनियाने त्रस्त असलेल्या पुरुषाच्या पत्नीने तिची समस्या जगासमोर ठेवली आहे. महिलेने पॅरेंटिंग फोरमला सांगितले आहे की तिचा नवरा, झोपेच्या दुर्मिळ विकारामुळे, झोपेत विचित्र वागतो आणि जबरदस्तीने लैं गि क संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही महिला जवळपास १० वर्षांपासून पतीसोबत राहत आहे.

    महिला म्हणते, ‘ झोपेत पतीच्या अशा तऱ्हेवाईक वागण्याने मला भंडावून सोडलं आहे, तो दररोज रात्री असं करत नाही. जेव्हा माझी झोपमोड होते तेव्हा त्याचे हात माझ्या अंगावर असतात. डोळे उघडताच मी त्याला जोरदार धक्का देते यामुळे त्याची झोपमोड होते आणि सर्वकाही तिथेच थांबतं.’

    स्लीपिंग डिसऑर्डरने पीडित महिलेच्या पतीच्या कृतीचे वर्णन करताना महिलेने सांगितले की, झोपेतून उठल्यानंतर अनेकदा मी स्वत: नको त्या अवस्थेत असते. याचा माझ्यावर वाईट परिणाम होतो आहे, कारण मी माझ्या पार्टनरला गेल्या १० वर्षांपासून ओळखते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. पण हे सगळं घडल्यानंतर माझा वापर करण्यात आलाय आणि मी स्वत:ला असुरक्षित असल्याचे मानते. माझं हे दु:ख शब्दांत व्यक्त अतिशय कठीण आहे.

    ती महिला म्हणाली, ‘ही तऱ्हेवाईक कृत्ये करताना मी त्याला एक-दोनदा उठवले आहे. त्याच्या जवळ येण्याचा थोड्याशा आवाजानेच माझे डोळे उघडतात. महिलेची आपबीती ऐकल्यानंतर पॅरेंटिंग फोरमचे युजर्स तिला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत आहेत.

    एका युजरने महिलेला रात्री रूम सोडून मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. युजरने महिलेला सांगितले की यावेळी तिला स्वतःला बचावाची गरज आहे.

    एका युजरने लिहिलं, तिच्या पतीला हे सगळं आठवतं का? तिच्या पतीला से क्सोमेनियाचा त्रास होत आहे. पण त्याला कधीच ही गोष्ट आठवली नाही. जेव्हा आम्ही याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होतं. यात मला बलात्कार झाल्यासारखे वाटत होते. यावर प्रतिक्रिया देताना महिला म्हणते, ‘नाही त्याला काहीही आठवत नाही. या गैरवर्तनाचे प्रमाण त्यावेळी जास्त असतं जेव्हा तो झोपेत अनेकदा असं करण्याचा प्रयत्न करतो आणि मी त्याला नकार देते.’

    एका युजरने पतीला दोष देण्याचे समर्थन केले आहे. युजरने लिहिले की, ‘मला वाटते की अशा चुकीसाठी माफीची अपेक्षा करणे योग्य नाही, ज्याबद्दल समोरच्या व्यक्तीला आठवत नाही किंवा त्यावर नियंत्रण नाही. तुम्ही त्याबद्दल नक्कीच बोलले पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन देणारे घटक ओळखले पाहिजेत.’

    आणखी एका युजरने लिहिले की, ‘तो झोपत आहे की नाही, पण सत्य हे आहे की तुमचे लैंगिक शोषण होत आहे. ती फक्त वैद्यकीय स्थिती आहे असे तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही ते स्वीकारत नाही. जोपर्यंत त्याचा आजार समोर येत नाही आणि त्याच्यावर उपचार होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीसोबत एकत्र झोपू नये. जर हा खरोखरच आजार असेल तर त्यात त्या व्यक्तीचा दोष नसून त्याबद्दल काही करणे ही त्याची जबाबदारी बनते, असे नाही की तुम्ही तो सहन करत रहावा.

    दुसर्‍या युजरने असहमत राहून लिहिले की, ‘आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती त्याच्या झोपण्याच्या सवयींबाबत किती बेफिकीर आहे. सुरुवातीला मला वाटले की, तो बेशुद्ध असेल तर त्यात त्याचा दोष नाही. पण ही समस्या त्याच्यासोबत वर्षानुवर्षे आहे हे त्याला माहीत आहे, मग ती थांबवण्यासाठी त्याने पावले का उचलली नाहीत.