बर्फी खा हेल्दी रहा! उपवासासाठी बनवा ‘मखाना’ बर्फी…

  श्रावण महिना हा उपवासाचा महिना म्हणून ओळखला जातो, उपवासासाठी काही मोजके पदार्थ खाल्ले जातात, आणि ते पदार्थ सतत खाल्याने नंतर खाण्यास नकोसे वाटते, त्यासाठी उपवासासाठी एक नवीन पदार्थ बनवा मखाना बर्फी, खा, रहा हेल्दी. त्याचबरोबर मखाना खाल्यामुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि आपण जास्त खाणे टाळतो म्हणून वजनदेखील नियंत्रणात राहते.

  साहित्य

  • १०० ग्रॅम मखाना
  • ५ वेलची
  • एक वाटी नारळ पावडर
  • एक वाटी शेंगदाणे
  • एक पाकीट दूध पावडर
  • ३०० ग्रॅम दूध
  • अर्धी वाटी साखर

  कृती

  • – हेल्दी मखाना बर्फी बनवण्यासाठी प्रथम नॉन-स्टिक पॅनमध्ये मखाना भाजून घ्या. यानंतर त्यात शेंगदाणे घालून ५ मिनिटे परतून घ्या.
  • – आता परतलेले मखाना आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या.
  • – यानंतर दुसर्‍या पातेल्यात दूध आणि साखर टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि ते उकळल्यावर त्यात बारीक केले मिश्रण घाला. सोबतच त्यात मिल्क पावडर टाका.
  • – सर्व गोष्टी एकत्र केल्यावर मिश्रण नीट ढवळून घ्या म्हणजे तळाला चिकटणार नाही. आता ते एका प्लेटमध्ये काढा आणि सेट करण्यासाठी थोडा वेळ ठेवा.
  • – मिश्रण थोडा घट्ट झाल्यावर म्हणजेच गोठल्यावर बर्फीच्या आकारात कापून घ्या आणि त्यावर थोडे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. अशाप्रकारे तुमची हेल्दी आणि टेस्टी मखाना बर्फी तयार आहे.