
आठवडाभर अरबट-चरबट खाणे टाळा. दैनंदिन जीवनात आपण काय, केव्हा आणि किती खातो यावर लक्ष ठेवता येत नाही. खाण्याच्या निश्चित वेळा ठरवून घ्या. मुख्यत्वेकरून रात्रीच्या जेवणाची वेळ. चहा-कॉफी, शीतपेये यांच्या अतिरेकामुळे लठ्ठपणा येतो.
गेल्या पाच वर्षामध्ये वीकेंडला व्यायाम करणा-यांची संख्या वाढत चाललेली आहे. चांगल्या आरोग्याबाबत येणा-या जागरूकतेचे हे फलित आहे हे नक्की. पण, वेळेच्या कमतरतेमुळे आणि योग्य ज्ञान, सल्ल्याच्या अभावी लोकांना फक्त वीकेंड्समध्येच व्यायाम करायला वेळ मिळतो. अशा लोकांना ‘वीकेंड योद्धे’ ही संज्ञा दिली जाते. बराच काळ व्यायामाशिवाय गेल्यावर अचानक एक-दोन दिवसात होणा-या व्यायामाच्या उत्साहात हे व्यायामपटू नियमित व्यायामाच्या सवयीपासून आणि फायद्यांपासून वंचित राहतात.
आठवडाभर स्वास्थ्य कसे जपावे ?
– आठवड्यात किमान पाच दिवस रोज किमान 45 मिनिटे हलका व्यायाम करा.
– फक्त तुमचे मित्र-मैत्रिणी खेळतात म्हणून एखादा खेळ खेळू नका. तुमच्या शरीराला योग्य असे प्रशिक्षण आणि सराव शक्य आहे का, याची खात्री करून घ्या. उदाहरणार्थ : गुडघ्यांचा त्रास असलेल्या लोकांनी टेनिस किंवा बॅडमिंटन खेळू नये.
– एखादा मैदानी आणि दमछाक करणारा खेळ सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यावसायिक प्रशिक्षकाकडून सराव करवून घ्या.
– व्यायामशाळेत व्यायाम करताना तुमच्या प्रशिक्षकाच्या सूचना काटेकोरपणे पाळा. सोशल मीडियावर बघून किंवा स्वत:च्या मनाने केलेला व्यायाम तुम्हाला इजा पोहोचवू शकतो.
– आठवडाभर अरबट-चरबट खाणे टाळा. दैनंदिन जीवनात आपण काय, केव्हा आणि किती खातो यावर लक्ष ठेवता येत नाही. खाण्याच्या निश्चित वेळा ठरवून घ्या. मुख्यत्वेकरून रात्रीच्या जेवणाची वेळ. चहा-कॉफी, शीतपेये यांच्या अतिरेकामुळे लठ्ठपणा येतो.
आरोग्याविषयी आणि व्यायामाविषयी वाढत असलेली ही जागरूकता नक्कीच स्वागतार्ह आहे. पण, ब-याच कालावधीनंतर अचानक व्यायाम करणे हे आरोग्याला घातक असते, हे उघडच आहे. आठवडय़ाचे पहिले पाच दिवस व्यायामाशिवाय घालवल्यावर अचानक व्यायामशाळेत जाऊन घाम गाळणे हे फार धोकादायक आहे. याने इजा तर संभवतेच, पण बॉडी मास इंडेक्सवरही त्याचा विपरीत परिणाम होतो.
आठवड्यासाठीवेळा ठरवून घेणे
– आपल्या आहारावर ताळतंत्र ठेवण्यासाठी खाण्याच्या वेळा आणि पदार्थाची नोंद ठेवा. आहारात बदल करण्यासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी या नोंदींचा उपयोग तुमच्या डाएटीशियनला होतो.
– एखाद्या रविवारी बसून तुमच्या आठवडाभराच्या आहाराचा आराखडा तयार करा. यामुळे अन्नाच्या वेळा चुकणे किंवा उद्याच्या जेवणाची तयारी घाईघाईत करणे टाळता येईल.
– आपल्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी व्यायाम आणि आहाराविषयी उपलब्ध असलेली अॅप्स वापरा.
– वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणाहून जवळच्या एखाद्या ठिकाणी व्यायाम करू शकता किंवा जवळच्या एखाद्या व्यायामशाळेत जाऊ शकता. व्यायाम फक्त सकाळीच करायचा असतो असे नाही. तो तुम्ही कुठल्याही ठरलेल्या वेळी करू शकता.
– आठवडय़ाचे फक्त एक-दोन दिवस व्यायाम करण्याऐवजी किंवा लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घेण्याऐवजी रोज नियमित व्यायाम करा आणि आरोग्यदायक आणि आरोग्यवर्धक जीवनशैली आचरणात आणा.