थॅलॅसेमिया आणि लोहाच्या कमतरतेचा ऍनिमियामधील फरक, जाणून तज्ज्ञांचे मत

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया आणि थॅलेसेमिया या दोन्ही स्थितींमध्ये ऍनिमिया होतो. थकवा येणे, दमल्यावर नीट श्वास न घेता येणे अशी लक्षणे या दोन्हींमध्ये दिसून येतात.

  निरोगी लाल पेशी किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण पुरेसे नसेल तर त्या स्थितीला ऍनिमिया म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, लोहाची कमतरता हा सर्रास आढळून येणारा आजार असून, जवळपास ४०% मुले आणि ३०% वयस्क महिलांना हा त्रास आहे.लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियामुळे लाल रक्तपेशींचा आकार लहान होतो, त्यामुळे मायक्रोसायटोसिस होतो, इतकेच नव्हे तर लाल रक्तपेशींचा रंग देखील फिकट पडतो, याला हायपोक्रोमिक म्हणतात. मायक्रोस्कोपिक हायपोक्रोमिक ॲनिमियाचे एक महत्त्वाचे मिमिक म्हणजे थॅलेसेमिया, हा हिमोग्लोबिनचा अनुवांशिक रोग आहे. अल्फा आणि बीटा-थॅलेसेमिया असे याचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

  लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया आणि थॅलेसेमिया या दोन्ही स्थितींमध्ये ऍनिमिया होतो. थकवा येणे, दमल्यावर नीट श्वास न घेता येणे अशी लक्षणे या दोन्हींमध्ये दिसून येतात. मायक्रोस्कोप आणि थेराप्युटिकल तपासण्यांमध्ये या दोन्हींचे वेगवेगळे स्वरूप दिसून येते. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी या दोन्हींमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे.या दोन्हींमधील फरक साध्या रक्ततपासणीतून समजून येऊ शकतो आणि त्यानुसार उपचार ठरवले जाऊ शकतात.

  कम्प्लिट ब्लड काउंट :

  लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियामध्ये हिमोग्लोबिन हे सामान्य पातळीपेक्षा कमी असते. तर थॅलेसेमियामध्ये लाल पेशींचे नुकसान होत असल्याने आणि जनुकीय दोषामुळे लाल पेशींचे उत्पादन अप्रभावी असल्याने लाल रक्तपेशींची संख्या तुलनेने जास्त असते.

  सीरम लोह पातळी:

  लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियामध्ये लोहाची पातळी कमी असते आणि फेरिटिन आणि हेमोसिडिरिन हे लोह साठवून ठेवणारे प्रोटीन देखील कमी असतात. थॅलेसेमियामध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या रक्त संक्रमणामुळे लोहाचा ओव्हरलोड होतो, त्यामुळे शरीरात लोह साठून राहते आणि अवयवांचे नुकसान होते. लाल पेशींच्या अप्रभावी उत्पादनामुळे लोह शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.

  या तपासण्यांव्यतिरिक्त मायक्रोस्कोपखाली लाल रक्तपेशींची तपासणी करून आणि इलेक्ट्रोफोरेसिस वापरून हिमोग्लोबिनचे सेपरेशन/कॉन्सन्ट्रेशन करून आयडीए व थॅलेसेमियातील फरक अधिक अचूकपणे समजून येतो.थॅलेसेमियाची पातळी प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी असते. काहींच्या बाबतीत अजिबात लक्षणे दिसून येत नाहीत तर काहींच्या बाबत जीवघेणी परिस्थिती उद्भवल्यामुळे रुग्णाला रक्त संक्रमणावर अवलंबून राहावे लागते. लोहाच्या कमतरतेसारख्या न्यूट्रीशनल ऍनिमियामध्ये एलिमेंटल आयर्नसह सहजपणे उपचार करता येतात. तर थॅलेसेमियामध्ये उपचार करणे गुंतागुंतीचे ठरू शकते, यामध्ये वारंवार रक्त संक्रमण करावे लागते किंवा क्युरेटिव्ह थेरपी म्हणून डोनर स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट देखील करावे लागू शकते.

  भारतामध्ये सध्या नॅशनल रजिस्ट्रीजचा अभाव असला तरी, थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त आहे, याच्या रुग्णांची संख्या जवळपास १ ते १.५ लाख असून जवळपास ४५ मिलियन कॅरियर्स आहेत. डायग्नोस्टिक टेस्ट्स आणि प्रभावी अँटीनेटल स्क्रीनिंगमधील प्रगतीमुळे थॅलेसेमियावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे थॅलेसेमिया सार्वजनिक आरोग्यावरील आणि अर्थव्यवस्थेवरील ओझे बनण्यापासून रोखले जाऊ शकते. दरवर्षी ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिवस पाळला जातो. २०२४ मध्ये या दिवसाची थीम ‘लोकांना सक्षम बनवणे, प्रगतीचा स्वीकार करणे – सर्वांसाठी समान व सहज उपलब्ध होतील असे थॅलेसेमियावरील उपचार उपलब्ध करवून देणे’ ही आहे.

  डॉ सुजा रामनाथन, हेमॅटोपॅथोलॉजिस्ट आणि चीफ ऑफ लॅब्स – हायटेक मेट्रोपॉलिस हेल्थकेयर, तामिळनाडू