भन्नाट पद्धतीने करा भरलेले बोंबील रोल; रेस्टॉरंट पध्दतीने ते ही कुरकुरीत

    साहित्य 

    • ६/७ ताजे बोंबील
    • १ कप ओली कर्दी
    • १ वाटी घरगुती लाल मसाला
    • २½ tblsp हळद, १ tblsp लाल मिरची पावडर
    • वाटणासाठी मूठभर कोथिंबीर, १५ लसूण,
    • २ तुकडे आले, ५ हिरव्या मिरच्या
    • एक लिंबाचा रस, १ कप चिरलेला पातीचा कांदा
    • १ कप मैदा, ½ कप रवा,
    • ३ tblsp कॉर्न फ्लॉवर, ३ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.

    चटणीचे साहित्य

    • ३०/४० पुदिन्याची पाने
    • छोटी मूठ कोथिंबीर
    • ५ हिरव्या मिरच्या
    • २ tblsp लिंबाचा रस
    • ६ लसूण पाकळ्या
    • ½” आले
    • १ tsp मीठ.

     

    कृती 

    • प्रथम आले, लसूण, मिरची कोथिंबीर याचे बारीक वाटण वाटून घ्यावे. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तयार वाटणातील २ चमचे वाटण तेलात परतून घ्यावे.
    • त्यानंतर यात पातीचा कांदा, १½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर यात कर्दी घालून एकजीव करावी.
    • आता वर झाकण ठेवून ७/८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावी. ( मध्ये मध्ये थोडे परतून घ्यावे. ) एका बाजूला चटणीचे साहित्य एकत्र मिक्सरला फिरवून बारीक चटणी वाटून घ्यावी.
    • आता कर्दीमध्ये १ tblsp लिंबाचा रस घालून एकजीव करावी आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यावा. आता प्रत्येक बोंबील लाटण्याने हलका दाब देऊन लाटून घ्यावा जेणेकरून मधला त्याचा काटा मोडला जाईल.
    • आता उरलेल्या वाटणामध्ये १ tsp हळद, २½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tblsp लिंबाचा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या आणि तयार मिश्रण बोंबलांना चांगले चोळून घ्या.
    • आता बोंबीलच्या वरच्या बाजूवर तयार कर्दी पसरून घाला आणि त्याचा रोल तयार करून घ्या. तयार रोल टूथ पीकच्या साहाय्याने बंद करून घ्या जेणेकरून बोंबील तेलात तळताना सुटणार नाही.
    • त्यानंतर एका प्लेटमध्ये मैदा, रवा, कॉर्न फ्लॉवर, १ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद आणि १ tsp मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा आणि या मिश्रणात बोंबील चांगले घोळून घ्या.
    • आता कढईत तेल गरम करून त्यात बोंबील कुरकुरीत होई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. बोंबील रोल गरम असतानाच पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.