As a fashion, the woman wrapped a live snake in her hair instead of rubber

  सध्या फॅशनच्या नावाखाली काहीही चालते. जगात असे काही लोक आहे जे अशी विचित्र फॅशन करतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिने तर फॅशनच्या बाबतीच हद्दच पार केली आहे. फॅशन म्हणून तिने आपल्या केसांना चक्क जिवंत सापच गुंडाळला आहे(As a fashion, the woman wrapped a live snake in her hair instead of rubber).

  केसांसाठी बऱ्याच अॅक्ससेरीज असतात. रबर, हेअरबँड, रिबन, क्लिप याशिवाय बरेच काही असते. पण या महिलेने आपल्या केसांसाठी अशी कोणतीच हेअर अॅक्सेसरीज वापरली नाही तर तिने एका जिवंत सापाचा वापर केला आहे. केसांना रबर लावण्याऐवजी तिने जिवंत साप गुंडाळला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला चालताना दिसते आहे.

  तिने केसांचा बन बांधला आहे. पण या बनला तिने कोणता रबर किंवा क्लिप लावला नाही आहे. तर एक साप गुंडाळाला आहे. केसांमध्ये साप घेऊन ही महिला एका मॉलमध्येही घुसते. महिलेच्या डोक्यात काहीतरी विचित्र दिसल्याने लोकांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या आणि त्यांना जेव्हा तिच्या केसात साप आहे हे समजले तेव्हा सर्वांना घामच फुटला. काही लोकांनी तर आपला मोबाईल काढून याचा व्हिडीओही बनवला.

  महिलेचे फॅशन म्हणून हे विचित्र एक्सपेरिमेंट पाहून सर्वांना धक्का बसणे साहजिकच आहे. इतर लोक तिच्या डोक्यात सापाला पाहून घाबरले आहेत पण तिच्या चेहऱ्यावर मात्र बिलकुल भीती दिसत नाही आहे. ती बिनधास्तपणे शॉपिंग करते आहे. जसे काही तिने याआधीसुद्धा केसांना साप गुंडाळला असावा. सापही केसांमध्ये एकदम घट्ट बसला आहे. स्नेक वर्ल्ड इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

  पाहा व्हिडिओ…

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ?SNAKE WORLD? (@snake._.world)