सणासुदीत घरच्याघरी उजळावा चेहऱ्याचे सौंदर्य; वापरा ‘या’ सोप्या टिप्स

    सणासुदी तयार होण्याची हौस असली तरी अनेकदा व्यस्ततेमुळे पार्लरमध्ये तासनतास घालवणे जमत नाही. अशात घरगुती उपाय अमलात आणले जाऊ शकतात. आपण घरीच असे उटणे तयार करू शकतात ज्याने आपण क्षणात घरी बसल्यास सुंदर त्वचा मिळवू शकते. आठवड्यातून एकदा यापैकी कोणतेही एक उटणे लावल्यास फरक जाणवेल.

    मुलतानी माती – ऑइली स्किनपासून सुटकारा मिळविण्यासाठी सर्वांत सोपा आणि घरगुती उपाय आहे मुलतानी माती. यात गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावावी वाळल्यावर चेहरा धुऊन घ्यावा.

    दही – दही आपल्या चेहऱ्यावरून तेल हटविण्यात मदत करेल. तसेच दह्यामुळे चेहऱ्याला आपोआप ब्लिच मिळते. आपण दह्याचा वापर बेसन मिसळून देखील करू शकता.

    बटाटे – बटाट्याच्या रस काढून चेहऱ्यावर लावावा. बटाट्याचा किस देखील फेस पॅकसारखे चेहऱ्यावर लावल्याने फायदा होईल.

    लिंबू – लिंबू ॲसिटिक असते, ज्यामुळे त्वचा उजळ होते. बेसनात लिंबू पिळून पॅक तयार करून चेहऱ्यावर लावावा.