आठवड्याचा फॅशन मंत्रा; रोजच दिसा आकर्षक

व्ही ब्लू किंवा बॉटल ग्रीनसारख्या गडद रंगाच्या पॉपलिन शर्टसोबत टॅन किंवा ब्राउन लेदर लोफर कॅरी करा. पॉपलिन शर्टवर ब्लेझर किंवा जॅकेटही घालता येईल.

  दररोजचा तोच तो बोअरिंग लूक नकोसा होतो. ऑफिस लूकमध्ये (Office look) वेगळेपण जपायचे तरी कसे, हा प्रश्न तरुण मंडळींना पडतो. ऑफिसमध्ये फॉर्मल्सना पर्याय नसतो. पण ऑफिसमध्ये फॅशन करता येत नाही हा समज अगदी चुकीचा आहे बरं का! ऑफिसमध्येही फॅशनेबल दिसण्यासाठी या खास टिप्स..

  – कँडी ब्लू स्ट्राईप्सवाला कॉलरचा पांढरा शर्ट, चिनोज आणि ब्राउन लेदर बूट या कॉम्बिनेशनने आठवड्याची सुरुवात करता येईल. वीकेंडनंतर आलेला कामाचा कंटाळा यामुळे दूर होईल.

  – मंगळवारसाठी वाईन किंवा बरगंडी रंगाचा ट्रेंडी कार्डिगन विकत घ्या. लेदरचे ब्रॉजेस घाला. हेरिंगबोन मफलरने हा लूक खुलवा.

  – पांढरा शर्ट आणि ट्राउझर हा लूक बुधवारसाठी राखून ठेवा. त्यावर काळे फॉर्मल बूट घाला.

  – व्ही ब्लू किंवा बॉटल ग्रीनसारख्या गडद रंगाच्या पॉपलिन शर्टसोबत टॅन किंवा ब्राउन लेदर लोफर कॅरी करा. पॉपलिन शर्टवर ब्लेझर किंवा जॅकेटही घालता येईल. पिंट्रेड पॉकेट स्क्वेलरने या लूकची शान वाढवता येईल. ऑफिस मटिंगसाठी हा लूक बेस्ट आहे. गुरुवारी ही फॅशन करा.

  – बर्‍याच ऑफिसमध्ये वीकेंडला कॅज्युअल्स कॅरी केले जातात. शुक्रवारसाठी ग्राफिक पोलो टी शर्ट राखून ठेवा. यासोबत फंक व्हाईट स्नीकर्स घाला. यामुळे कामाचा उत्साह वाढेल.