क्रोम नेल आर्टची फॅशन

    नेल आर्ट हा फॅशनवेड्या तरुणींचा जिव्हाळ्याचा विषय असतो. या नेल आर्टमध्ये नुकताच एक ट्रेंड आला आहे, त्याचे नाव आहे क्रोम नेल आर्ट (chrome nail art). यासाठीच्या विशिष्ट नेलपेंटमुळे नखे खूपच आकर्षक दिसतात. पार्टीवेअर ड्रेसवर या प्रकारची नेलपेंट खूप छान दिसतात. या नेलपेंटमध्ये कॉपर, गोल्ड, शॅम्पेन शेड्‌स उपलब्ध आहेत. सिल्व्हर आणि ब्लॅक हे दोन रंग क्‍लासिक क्रोम कलर आहेत.

    होलोग्राफिक कलर
    चमक, रंग, स्टायलिश असल्याने होलोग्राफिक क्रोमला तरुणी जास्त प्राधान्य देतात. होलोग्राफिक नेल्स करण्यासाठी बाजारात सॅलोफेन आणि फॉइलसारखी उपकरणे मिळतात.

    पिंक क्रोम नेल्स
    पिंक हा रंग मुलींच्या अतिशय आवडीचा असतो. हा रंग कोणत्याही कपड्यावर उठून दिसतो. यासाठी पिंक नेलपेंट क्रोम ग्लिटरसोबत ट्राय करा.

    रोज गोल्ड
    रोज गोल्ड क्रोम नेल्स क्‍लासी लुक देतात. हा प्रकार तुम्ही कधीही ट्राय करू शकता. यामध्ये स्टोन्सचा थ्रीडी इफेक्‍ट भारी लुक देतो.

    कॉपर क्रोम
    क्रोम कलर्समध्ये सगळ्यात जास्त पसंती कॉपर कलरला दिली जाते. यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते; पण एकदा तयार झाले की, आरशासारखे चकाकते. या नेल आर्टचे सौंदर्य पाहिल्यावर आजूबाजूच्या गोष्टी आणि इतर ऍक्‍सेसरीजही फिक्‍या दिसू लागतात. हा प्रकार सर्व प्रकारच्या, सर्व रंगांच्या पेहरावावर ट्राय करता येईल.

    मेटॅलिक रेड विथ राइनस्टोन्स
    ग्लॅमरस दिसण्यासाठी मेटॅलिक रेड विथ राइनस्टोन्स ट्राय करा. यामध्ये नखे रेड क्रोम आणि सिल्व्हर कलरच्या मदतीने सजविली जातात. या सजावटीसाठी राइनस्टोन्सचा वापर केला जात असल्यामुळे नखांचे सौंदर्य आणखीनच खुलते.

    मेटेलिक ब्ल्यू
    ब्ल्यू नेलपेंटच्या बेसवर छोटे समुद्री जीव, स्टिकर चिकटवल्यास खूप सुंदर दिसते. हा प्रकार एखाद्या थीम पार्टीला जाताना ट्राय करता येईल.