पावसाळ्यात लग्न करताय?; मग अशी करा तयारी

तुम्ही पावसाळ्यात विवाह करण्याचे नियोजन केले आहे. परंतु पाऊस या सोहळ्यात अडथळा निर्माण करेल, अशी भीतीही वाटत आहे. मात्र, यामुळे तुम्ही चिंतेत राहण्याची काहीच गरज नाही. पावसाळ्यातील विवाहासाठीच्या काही टिप्स देत आहोत.

  – तुमच्या विवाह सोहळ्यास अधिक धमाकेदार बनविण्यासाठी डांस पार्टीचे नियोजन करा.
  – पावसाळ्यात बसण्याची व्यवस्था करणे अधिक कठीण होते. यासाठी बिन बॅग सीटिंग उपयुक्त ठरतात.
  – सजावटीसाठी नियोन्स, नकली फुले आणि रिबनचा उपयोग करू शकता.

  – पावसाळ्यात विवाह करत आहात तर तुम्ही आमंत्रण पत्रिकेपासून ते जेवणापर्यंत मान्सून थीमचा वापर करू शकता.
  – या ऋतूमध्ये तुम्ही फ्रेश रंगांची कपडे परिधान करावीत. जसे की, गुलाबी, लाल, सोनेरी आदी.
  – तुमचा मोबाईल किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी वॉटरप्रुफ बॅगचा वापर करा.